एडकाच्या मृत्यूला कारणीभूत अधिकाऱ्याची सेवाबहाली

By Admin | Updated: August 8, 2015 02:55 IST2015-08-08T02:55:36+5:302015-08-08T02:55:36+5:30

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या एडका मासा आत्राम या आदिवासी तरुणाच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणि न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे ...

Service service | एडकाच्या मृत्यूला कारणीभूत अधिकाऱ्याची सेवाबहाली

एडकाच्या मृत्यूला कारणीभूत अधिकाऱ्याची सेवाबहाली

पदोन्नतीचेही प्रयत्न : पोलीस दलात चर्चेला उधाण
नरेश डोंगरे  नागपूर
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या एडका मासा आत्राम या आदिवासी तरुणाच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणि न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची सेवाबहाली सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. सेवाबहालीनंतर पदोन्नतीच्या निमित्ताने सुरू असलेल्या हालचालीमुळे हे प्रकरण नव्याने चर्चेला आले आहे.
दीपक कृष्णा डेकाटे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून तो सध्या वाशिममध्ये सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. १९९२ ला डेकाटे गडचिरोली जिल्ह्यातील भागरागड पोलीस ठाण्यात पीएसआय म्हणून कार्यरत होता. त्यावेळी नक्षलवाद्यांना जेवण पुरविले म्हणून एडका मासा आत्राम या आदिवासी तरुणाला पोलिसांनी घरून उचलून नेले. त्याला बेदम मारहाण केल्यामुळे एडकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आपले पाप लपविण्यासाठी दोषी पोलिसांनी तो (एडका) नक्षलवादी असल्याचा कांगावा केला.
एडकाला नक्षलवादी संबोधून त्याचा मृत्यू झाल्याची मखलाशी गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधिकारी करीत असतानाचा वृत्तपत्रांनी या प्रकरणातील वास्तव प्रकाशित करून पोलिसांच्या पापाची लक्तरे वेशिवर टांगली होती. त्यावेळी हे प्रकरण देशभर गाजले आणि प्रचंड दबाव निर्माण झाल्यामुळे एडकाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल झाले. त्यात डेकाटेचाही समावेश होता. न्यायालयाने त्याला १ डिसेंबर २०११ रोजी दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
बडतर्फी अन् सेवाबहाली
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे पोलीस खात्यानेही डेकाटेला पोमसं/ ११अ/२२/७/२२७/२०११ च्या दि. २०आॅगस्ट २०१३ च्या अंतिम आदेशान्वये पोलीस खात्यातून बडतर्फ केले. यावेळी डेकाटे नागपूर ग्रामीणमध्ये कार्यरत होता. या बडतर्फीविरुद्ध डेकाटेने अपील केले. २४ फेब्रुवारी २०१४ च्या पत्रान्वये पोलीस महासंचालनालयातर्फे त्याचा अर्ज शासनाकडे पाठविण्यात आला. पुढे झालेल्या हालचालीनंतर डेकाटेवर मेहरबान झालेल्या यंत्रणेने त्याला पोलीस दलात पुन्हा रुजू करून घेतले. दरम्यान त्याचे पीएसआय ते एपीआय प्रमोशनही झाले होते. २२ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे एडकाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांच्या घडामोडीकडे कुणाचे फारसे लक्ष गेले नाही.

Web Title: Service service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.