शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्व्हर’चा झटका अभ्यासाला फटका

By admin | Updated: May 17, 2016 02:09 IST

अगोदरच विदर्भातील तापमान तापलेले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित

नागपूर विद्यापीठ : पेपरच्या एक दिवस अगोदर परीक्षा प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांची धावाधावनागपूर : अगोदरच विदर्भातील तापमान तापलेले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऐन उन्हात धावाधाव करावी लागत आहे. विद्यापीठाचे ‘सर्व्हर’ संथ झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र ‘डाऊनलोड’ होण्यास वेळ झाला. त्यामुळे परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत प्रवेशपत्र घेण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयाच्या चकरा मारताना दिसून आले. नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेचा पाचवा आणि महत्त्वाचा टप्पा सोमवारपासून सुरू झाला. यात अभियांत्रिकीसह बीएसस्सी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील एमए, एमएसस्सी, बीएसस्सी द्वितीय, चतुर्थ आणि नियमित अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. या टप्प्यात सुमारे दोन लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यापीठाची परीक्षा प्रणाली ‘आॅनलाईन’ असल्याने प्रवेशपत्रदेखील ‘डाऊनलोड’ करावे लागतात. महाविद्यालयांकडून ही प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना देण्यात येतात. परंतु दोन दिवस अगोदरपर्यंत अनेक महाविद्यालयांच्या ‘लॉग इन’मध्ये प्रवेशपत्रच दिसत नव्हते. विद्यार्थी सातत्याने महाविद्यालयांमध्ये फेऱ्या मारतच होते.अखेर दोन दिवस अगोदर महाविद्यालयांकडे परीक्षा प्रवेशपत्रे पोहोचली. परंतु बहुतांश महाविद्यालयांनी लगेच प्रवेशपत्रे ‘डाऊनलोड’ करण्यास सुरुवात केल्यामुळे विद्यापीठाच्या ‘सर्व्हर’वर त्याचा परिणाम झाला व ओळखपत्रे फारच संथ गतीने ‘डाऊनलोड’ व्हायला लागली. त्यामुळे अखेरच्या दिवशीदेखील शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली.(प्रतिनिधी)‘आॅनलाईन’चा काय उपयोग?४आम्ही वेळेवर परीक्षा अर्ज भरले, शुल्कदेखील दिले. अशा स्थितीत आम्हाला वेळेअगोदर परीक्षा प्रवेशपत्रे मिळणे अपेक्षित होते. परंतु असे काहीही झाले नाही आणि उलट आम्हाला अभ्यास सोडून महाविद्यालयांत फिरावे लागत आहे. असल्या ‘आॅनलाईन’ प्रणालीचा काय उपयोग अशी संतप्त भावना काही विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.तांत्रिक अडचणीमुळे झाला गोंधळ४यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता तांत्रिक अडचणींमुळे हा गोंधळ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकाच वेळी सर्व महाविद्यालयांनी परीक्षा प्रवेशपत्रे ‘डाऊनलोड’ करण्याचा प्रयत्न केला. प्रवेशपत्रे ही ‘पीडीएफ’मध्ये असतात. त्यामुळे सहाजिकच ‘सर्व्हर’वर ताण आला. परंतु अखेरच्या दिवशी सर्वांनाच प्रवेशपत्रे मिळाली आहेत. काही विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे तांत्रिक कारणांमुळे तयार झाली नव्हती. त्यांनादेखील दिलासा देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.