सर्व्हर डाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:12 IST2020-12-30T04:12:47+5:302020-12-30T04:12:47+5:30

नरखेड : नरखेड तालुक्यात ग्रा.पं. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या सर्व्हर डाऊनचा फटका बसला. मंगळवार सकाळपासून सर्व्हरची ...

Server down shot | सर्व्हर डाऊनचा फटका

सर्व्हर डाऊनचा फटका

नरखेड : नरखेड तालुक्यात ग्रा.पं. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या सर्व्हर डाऊनचा फटका बसला. मंगळवार सकाळपासून सर्व्हरची गती फारच कमी किंवा पूर्णत: बंद असल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिवसभर होते. तालुक्यात १७ ग्रामपंचायतींच्या ५५ वॉर्डातून १४६ सदस्य निवडायचे आहेत. यावेळी सरपंच आरक्षण जाहीर न झाल्यामुळे एकाही ग्रामपंचायतीमध्ये अविरोध निवडणूक होईल असे चिन्ह नाही. त्यामुळे निवडणूक लढणाऱ्यांची संख्या वाढण्याचे चिन्ह आहे. ग्रामपंचायत स्तरावर वेळेवर उमेदवाराची निवड होत असल्यामुळे शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची संख्या मोठी संख्या असते. राखीव मतदार संघातून निवडणूक लढण्याकरिता जात वैधता प्रमाणपत्राकरिता विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व विभागीय जात अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. सदर प्रस्ताव हा ऑनलाईन भरून समितीसमोर प्रस्ताव सादर करून त्याची पोचपावती नामनिर्देशनपत्राला जोडणे आवश्यक आहे. मंगळवारी सकाळपासून फॉर्म अपलोड करण्याकरिता असलेल्या सर्व्हरची गती फार कमी किंवा पूर्णत: बंद असल्यामुळे दिवसभर उमेदवार व त्यांच्या समर्थकांची धावपळ सुरू होती. सायंकाळी ५.३० वाजता निवडणूक आयोगाकडून आलेल्या निर्देशानुसार ३० डिसेंबरला ऑफलाईन नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचे निर्देश आले. यानंतर उमेदवार व समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

---------

सकाळी ११ वाजतापासून नेट कॅफेमध्ये नामनिर्देशनपत्र भरण्याकरिता बसली आहे. सर्व्हर नसल्यामुळे फॉर्म अपलोड होऊ शकला नाही.

- माधुरी राजेश चौरे, जलालखेडा

----------

सकाळी ८ वाजतापासून कॅफे उघडून नामनिर्देशनपत्र अपलोड करणे सुरू केले. परंतु सर्व्हरची गती फार कमी व वारंवार अडथळे येत असल्यामुळे ५.३० वाजेपर्यंत केवळ दोनच फॉर्म अपलोड होऊ शकले.

- प्रवीण लाड, संगणक ऑपरेटर

----------

नामनिर्देशनपत्र ऑनलाइन अपलोड करताना संगणक ऑपरेटर.

Web Title: Server down shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.