शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राष्ट्र व संस्कृत भाषेची सेवा करा : जगद्गुरु रामानंदाचार्यस्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:20 AM

भाषा ही देशाच्या अस्मितेचे प्रतीक असते. संस्कृत ही संस्कारांची भाषा आहे. संस्कृतच्या माध्यमातून लोक एकजूट व सुसंस्कृत होतात. हेच या भाषेचे सामर्थ्य आहे. विद्यार्थ्यांनी देश व संस्कृत भाषा या दोघांचीही सेवा केली पाहिजे, असे मत रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय, चित्रकूट, उत्तर प्रदेश येथील कुलपतीजगद्गुरु रामानंदाचार्यस्वामी रामभद्राचार्य यांनी व्यक्त केले. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभादरम्यान ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देकविकुलगुरू कालिदास विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाषा ही देशाच्या अस्मितेचे प्रतीक असते. संस्कृत ही संस्कारांची भाषा आहे. संस्कृतच्या माध्यमातून लोक एकजूट व सुसंस्कृत होतात. हेच या भाषेचे सामर्थ्य आहे. विद्यार्थ्यांनी देश व संस्कृत भाषा या दोघांचीही सेवा केली पाहिजे, असे मत रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय, चित्रकूट, उत्तर प्रदेश येथील कुलपतीजगद्गुरु रामानंदाचार्यस्वामी रामभद्राचार्य यांनी व्यक्त केले. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभादरम्यान ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.श्रीनिवास वरखेडी हे होते तर ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर हेदेखील उपस्थित होते. मानवाचे जीवन हे यज्ञासारखे आहे. दीक्षेचा अर्थ स्वत:चा विचार न करता राष्ट्राला जीवन अर्पण करणे हा होता. वाईट गोष्टींपासून दूर राहणे हेच दीक्षाव्रताचे आचरण आहे. देश, आई-वडील, गुरू, अतिथी यांच्याप्रति असलेल्या कर्तव्यांचे योग्य पद्धतीने निर्वाहन करणे हाच दीक्षेचा उपदेश आहे, असे रामानंदाचार्यस्वामी रामभद्राचार्य यांनी सांगितले. डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी प्रास्ताविक केले.मधुरा,श्रीवरदाला सर्वाधिक पदकेदीक्षांत समारंभात योग, योगविज्ञान, वास्तू, जर्मन, वेद, ग्रंथालयशास्त्र, ज्योतिष, कीर्तन, प्रशासकीय सेवा, शिक्षण, संगणक उपायोजन, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला व ललित कला यासारख्या ३५ विषयांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ६२ पदके व २८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले तर २३ संशोधकांना ‘पीएचडी’ प्रदान करण्यात आली. एम.ए.संस्कृत विषयात अव्वल राहिलेली मधुरा यशवंत कायंदे व श्रीवरदा श्रीपाद मालगे यांना प्रत्येकी सात पदके व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.गुणवंतांना बसला अव्यवस्थेचा फटकादीक्षांत समारंभादरम्यान अव्यवस्थेमुळे गुणवंतांना नाहक मनस्ताप झाला. कार्यक्रम लवकर आवरता घेण्याच्या प्रयत्नात सात गुणवंतांना मंचावर बोलविण्याचाच प्रशासनाला विसर पडला. समारंभानंतर विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे याची तक्रार केली. यानंतर विद्यार्थ्यांना पदके व पुरस्कार प्रदान करण्यात आले. सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांना मंचावर पदवी प्रदान करण्यात येत असताना इतर विद्यार्थीदेखील छायाचित्र काढण्यासाठी मंचावर चढले. अव्यवस्था दूर करण्यासाठी एकाही अधिकाऱ्याने पुढाकार घेतला नाही.

 

टॅग्स :Kavi Kulguru Kalidas Sanskrit Universityकवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठStudentविद्यार्थी