खळबळजनक; इंग्लंडवरून नागपुरात परतलेल्या युवकाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 14:19 IST2020-12-24T14:18:51+5:302020-12-24T14:19:57+5:30

इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला कोरोना पॉझिटिव्ह युवक नियम न पाळता नागपूर व गोंदियात फिरला. यामुळे कुटुंबातील सदस्यांसह त्याच्या संपर्कात आलेले दहा जण पॉझिटिव्ह असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Sensational; Samples of youth returning to Nagpur from England to Pune for examination | खळबळजनक; इंग्लंडवरून नागपुरात परतलेल्या युवकाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला

खळबळजनक; इंग्लंडवरून नागपुरात परतलेल्या युवकाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला

ठळक मुद्देकोरोना नवीन की जुना, प्रशासन धास्तीत संपर्कात आलेले १० जण पॉझिटिव्ह असल्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला कोरोना पॉझिटिव्ह युवक नियम न पाळता नागपूर व गोंदियात फिरला. यामुळे कुटुंबातील सदस्यांसह त्याच्या संपर्कात आलेले दहा जण पॉझिटिव्ह असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान या युवकाचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यावर कोरोना नवीन की जुना हे स्पष्ट होईल. तरी या घटनेमुळे नागपूर शहरात खळबळ उडाली असून प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

नंदनवन येथील रहिवासी असलेला निहाल साहू २८ वर्षीय हा युवक पुणे येथील एका कंपनीत कार्यरत आहे. कंपनीच्या कामानिमित्त महिनाभरापूर्वी तो इंग्लंडला गेला होता. तो २९ नोव्हेंबरला नागपूरला परतला. लक्षणे नसल्याने त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले. याचदरम्यान तो घरात न राहता बाहेर पडला. तसेच गोंदियालाही जाऊन आला. दरम्यान त्याला लक्षणे दिसू लागल्याने त्याने १५ डिसेंबर रोजी नंदनवन येथील आरोग्य केंद्रात ॲन्टीजेन टेस्ट केले. यात तो पॉझिटिव्ह आला.

मिळालेल्या माहितीनुसार मनपाच्या कोविड नियंत्रण कक्षाला या युवकाची माहिती मिळाली. मनपाच्या पथकाने बुधवारी युवकाला मेडिकलच्या विशेष वाॅर्डात भर्ती केले. या युवकाचे दोन नमुने घेण्यात आले आहे. एक नमुना मेडिकलच्या प्रयोगशााळेत तपासला जाईल तर दुसरा नमुना पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत (एनआयव्ही ) त्याच्या स्ट्रेनचे स्वरुप शोधण्यासाठी पाठवण्यात आला आहे.

हा युवक इंग्लंडवरून परतला असल्याने त्याला मेडिकलच्या विशेष वाॅर्डात स्वतंत्र ठेवण्यात आल्याची माहिती मेडिकलचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी लोकमतला दिली.

-------------

Web Title: Sensational; Samples of youth returning to Nagpur from England to Pune for examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.