शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खळबळ : पुलगावच्या तरुणाचे नागपुरातून अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 16:21 IST

नोकरीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतल्यानंतर गावातून पसार झालेल्या एकाला चार जणांनी हॉटेलमध्ये शिरून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला आपल्या वाहनात कोंबून ते पळून गेले. बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास गणेशपेठच्या जाधव चौकातील हॉटेल अर्जूनमध्ये ही घटना घडली.

ठळक मुद्देहॉटेलमध्ये बेदम मारहाणवाहनात कोंबून पळवून नेलेगणेशपेठमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोकरीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतल्यानंतर गावातून पसार झालेल्या एकाला चार जणांनी हॉटेलमध्ये शिरून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला आपल्या वाहनात कोंबून ते पळून गेले. बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास गणेशपेठच्या जाधव चौकातील हॉटेल अर्जूनमध्ये ही घटना घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनूप चंद्रकांत मिरगे (वय ३४) असे अपहृत व्यक्तीचे नाव आहे. तो वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी आहे. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याने नागरिकांकडून मोठी रक्कम गोळा केली आणि अनेकांची फसवणूक करून तो पसार झाल्याचा आरोप आहे. तो नागपुरात कॉटन मार्केटजवळच्या हॉटेलमध्ये दडून बसल्याची माहिती त्याला रक्कम देणा-यापैकी काहींना मिळाली. त्यावरून बुधवारी रात्री ११ च्या सुमारास चार आरोपी हॉटेलमध्ये शिरले. त्यांनी रुम नंबर १०५ मध्ये असलेल्या अनुप मिरगेला बेदम मारहाण केली. ‘नोकरीचे आमिष दाखवून रक्कम घेतो आणि नोकरी लावून देत नाही. पैसेही परत करीत नाही अन् पळून जातो,’ असा आरोप करून त्याला मारतच हॉटेलबाहेर काढले. ते पाहून हॉटेलचे व्यवस्थापक, कर्मचारी तसेच श्रीकांत राजू लांडगे (वय ३१, रा. सदर) यांनी आरोपींना रोखण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांना न जुमानता आरोपींनी त्याला आपल्या वाहनात (एमएच ३१/ डीके ०४६०) मध्ये बसवून पळवून नेले.मिरगे सापडलाअपहरणाच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. लांडगे यांनी दिलेल्या माहितीवरून गणेशपेठचा पोलीस ताफा हॉटेलमध्ये पोहचला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना तपासताना मिरगेचा एक साथीदार पोलिसांना दिसला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर मिरगेची पत्नी चंद्रपूरला राहते, तिला भेटून तो दोन दिवसांपासून या हॉटेलमध्ये येत जात आहे, अशी माहिती त्याने दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला अधिक बोलते केले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गणेशपेठ पोलिसांनी रात्रभर ईकडे तिकडे शोधाशोध करून पहाटेच्या वेळी अपहृत मिरगेसह चार संशयीतांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरू होती.

टॅग्स :Kidnappingअपहरणnagpurनागपूर