नागपूर विधानभवनासमोर मृतदेह आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:39 IST2017-12-12T23:38:42+5:302017-12-12T23:39:35+5:30
विधान भवनासमोरच्या फूटपाथवर सोमवारी रात्री ११.१५ वाजता एका वृद्ध इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

नागपूर विधानभवनासमोर मृतदेह आढळल्याने खळबळ
ऑनलाईन लोकमत
नागपूर : विधान भवनासमोरच्या फूटपाथवर सोमवारी रात्री ११.१५ वाजता एका वृद्ध इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृताचे वय अंदाजे ६० ते ६५ वर्षे आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनामुळे या भागात प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे. रात्री ११.१५ च्या सुमारास विधान भवनासमोरच्या फूटपाथवर एक व्यक्ती पडून दिसल्याने पोलिसांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणतीही हालचाल होत नव्हती. त्यामुळे त्याला तपासले असता ती व्यक्ती मृतावस्थेत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. सीताबर्डी पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, २४ तास होऊनही त्याची ओळख पटू शकली नाही. सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृत व्यक्ती नागपूरची की बाहेरची ते स्पष्ट झाले नाही. तो मोर्चात आला असावा असा अंदाज आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.