शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागात खळबळ : गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये बिबट्याने केली काळवीट, चितळाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:27 IST

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील रेस्क्यू सेंटरमध्ये शिरून एका बिबट्याने चार चितळ, चार काळवीट आणि एका चौसिंग्याला ठार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे वन विभागात खळबळ उडाली असून हल्ला केलेला बिबट गोरेवाडा जंगलातून आल्याची माहिती गोरेवाडा रेस्क्यू सेंटरच्यावतीने देण्यात आली.

ठळक मुद्देगोरेवाडा जंगलातून आला बिबट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील रेस्क्यू सेंटरमध्ये शिरून एका बिबट्याने चार चितळ, चार काळवीट आणि एका चौसिंग्याला ठार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे वन विभागात खळबळ उडाली असून हल्ला केलेला बिबट गोरेवाडा जंगलातून आल्याची माहिती गोरेवाडा रेस्क्यू सेंटरच्यावतीने देण्यात आली.बुधवारी सकाळी गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये चार चितळ, चार काळवीट आणि एका चौसिंग्याला बिबट्याने ठार केल्याची घटना उघडकीस आली. गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला इलेक्ट्रॉनिक तारेचे कुंपण आहे. हे कुंपण ओलांडून बिबट्याने १५ फूट पिंजऱ्यात शिरून काळवीटासह चितळ आणि चौसिंग्याला ठार केल्यामुळे गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. गोरेवाडाचे विभागीय वनाधिकारी नंदकिशोर काळे यांनी सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी राहिल्यामुळे ही घटना घडल्याचे मान्य केले. नेमक्या काय त्रुटी राहिल्या याचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. डिसेंबर २०१५ मध्ये गोरेवाडा रेस्क्यू सेंटरची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १४ एप्रिल २०१६ मध्ये बिबट्याने आत प्रवेश करून तीन काळवीटांची शिकार केली होती. अशा घटना घडू नयेत यासाठी जानेवारी २०१९ मध्ये इलेक्ट्रॉनिक फेन्सिंग (जाळी) लावण्यात आली होती. परंतु त्यानंतरही बिबट्याने आत प्रवेश करून हरिणांची शिकार केली. कुंपणात कुठे फट राहिली की बिबट्याला कुंपणावरून आत उडी मारण्यासाठी उंच जागा मिळाली याचा तपास करून त्यातील त्रुटी दूर करण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले. इलेट्रॉनिक फेन्सिंग करताना ‘एनटीसीए’च्या अटींचे पालन करण्यात आले असून कोणत्याच नियमांचे उल्लंघन झाले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृत प्राण्यांचे शवविच्छेदन बुधवारी करण्यात आले. शवविच्छेदनात चार चितळ, तीन काळवीट व एका चौसिंग्याचा मृत्यू श्वसन व हृदयक्रिया बंद पडल्यामुळे आणि एका काळविटाच्या शरीराचा बराच भाग खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर या मृत प्राण्यांना दफन करण्यात आले. ही कारवाई गोरेवाडा रेस्क्यू सेंटरचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे, वन्य प्राणी बचाव केंद्राचे वन परिक्षेत्र अधिकारी आर. पी. भिवगडे, वनपाल पी. एम. चौहान, वनरक्षक आर. एच. वाघाडे, डॉ. व्ही. एम. धूत, डॉ. पी. एम. सोनकुसळे, डॉ. शालिनी, डॉ. एम. डी. पावशे, डॉ. एस. एम. कोलंगथ यांनी पार पाडली.

 

टॅग्स :Gorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालयleopardबिबट्या