शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

नागपुरात बारा दिवसांच्या मुलीच्या सौदेबाजीने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 9:21 PM

केवळ बारा दिवसांच्या मुलीच्या सौदेबाजीचे प्रकरण पुढे आल्याने शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडालेली आहे.

ठळक मुद्देआरोपी दाम्पत्याला अटक : तीन दिवसांचा पीसीआरमुलगी बेपत्ताच : दुसऱ्यांदा विक्री, पुणे येथे असण्याची शक्यता

आॅनलाईन लोकमतनागपूर : केवळ बारा दिवसांच्या मुलीच्या सौदेबाजीचे प्रकरण पुढे आल्याने शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडालेली आहे. मुलगी बेपत्ता असून या मुलीची खरेदी करणाऱ्या एका दाम्पत्याला धंतोली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दाम्पत्याला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. ए. जाधव यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची ८ डिसेंबरपर्यंत तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.मनीष सूरजरतन मुंदडा (३६) त्याची पत्नी हर्षा सूरजरतन मुंदडा (३२) रा. सेनापतीनगर दिघोरी, अशी आरोपींची नावे आहे.प्रकरण असे की, वैभवनगर वाडी येथे राहणाऱ्या मोना अविनाश बारसागडे (२६) नावाच्या महिलेला काही दिवसांपूर्वी लॉ कॉलेज चौकातील एका इस्पितळात भारती नावाची एक महिला भेटली होती. या महिलेने मोनाचे चेकअप करून तिची या दोन्ही आरोपींसोबत भेट घालून दिली होती. पुढे ३ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक आॅफ इंडियासमोर या दाम्पत्याने मोनासोबत मुलीचा पाच लाखात सौदा करून काही पैसे तिला दिले होते आणि मुलगी घेऊन गेले होते. ही मुलगी आरोपी दाम्पत्याने अन्य कुणाला तरी विकली असून ती पुणे येथे असल्याचे पोलिसांना समजले आहे. मोनाने आपली मुलगी परत मागितली असता या दाम्पत्याने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलगी परत करण्यास नकार दिला.मोना बारसागडे हिने ५ डिसेंबर रोजी घडलेल्या प्रकाराबाबत धंतोली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावरून पोलिसांनी बुधवारी पहाटे भादंविच्या ३७०, ५०६, ३४ आणि बाल न्याय कायद्याच्या ८१ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी दाम्पत्याला ताबडतोब अटक केली. महिला पोलीस उपनिरीक्षक एस. ए. यादव यांनी त्यांना न्यायालयात हजर केले. सरकार पक्षाने भारती नावाच्या महिलेला अटक करण्याचे आणि बेपत्ता मुलीचा शोध घेण्याचे कारण सांगून आरोपी दाम्पत्याची १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळण्याची वनंती केली.न्यायालयाने ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. न्यायालयात सरकारच्या वतीने सरकारी वकील मैथिली काळवीट तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. मंगेश मून यांनी काम पाहिले.

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा