राष्ट्रीय क्रीडा दिनाला ज्येष्ठ पहेलवानांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:15 IST2021-09-02T04:15:40+5:302021-09-02T04:15:40+5:30
नागपूर : नगर आखाडा संघटन समिती रेशीमबागतर्फे राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त ज्येष्ठ पहेलवानांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार ...

राष्ट्रीय क्रीडा दिनाला ज्येष्ठ पहेलवानांचा सत्कार
नागपूर : नगर आखाडा संघटन समिती रेशीमबागतर्फे राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त ज्येष्ठ पहेलवानांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार गेव्ह आवारी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ज्येष्ठ पहेलवानांचा शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ईश्वर झाडे यांनी केले. आभार रवी डेकाटे यांनी मानले. याप्रसंगी माजी आमदार यादवराव देवगडे, घनश्याम निमवाले, कृष्णराव खापेकर, विजयसिंग वर्मा, ॲड. राजेश नायक, चिंतामण घोगरे, गजेंद्र डफ, हरिश्चंद्र हेडाऊ, पुरुषोत्तम निमजे, शिवचरण धार्मिक, विजय गायकी, मुकुंद मेंढेकर, राकेश ठाकरे, पवन झाडे, शरद कांबळे आदी उपस्थित होते.
विभागीय क्रीडा संकुलात राष्ट्रीय क्रीडादिन साजरा
()
नागपूर : नगर आखाडा संघटन अस्थायी समिती, जिल्हा कुस्तीगीर संघटना, स्टार रेसलिंग अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडादिन विभागीय क्रीडा संकुलात साजरा करण्यात आला. यानिमित्त २३ वर्षांखालील ग्रीको रोमन मुले, फ्रीस्टाईल मुलेमुली, कुस्ती निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या हस्ते ध्यानचंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला गणेश कोहळे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर हरिहर भवाळकर, दिलीप इटनकर उपस्थित होते. अनिल आदमने यांनी संचालन केले, नीलेश राऊत यांनी आभार मानले. याप्रसंगी शामराव खडसे, भूषण कळमकर, अभय महले, अनिल बोरवार, रवींद्र हजारे, धीरज यादव, केशव डंभारे, सतीश वाघमारे, सेवक गडे, नामदेव काटोके, आशिष नागठाणे, प्रभाकर पावडे, गोवर्धन वरठी, रामा यंगड, विशाल ढाके, जसबीर कातरपवार, कार्तिक भांडे आदी उपस्थित होते.