ज्येष्ठ पत्रकार मनोहर अंधारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 00:19 IST2021-04-30T21:38:25+5:302021-05-01T00:19:08+5:30

Senior journalist Manohar Andhare passes away ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोहर प्रभाकर उपाख्य बाबासाहेब अंधारे यांचे आज वृद्धापकाळाने हैदराबाद येथे निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते.

Senior journalist Manohar Andhare passes away | ज्येष्ठ पत्रकार मनोहर अंधारे यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार मनोहर अंधारे यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोहर प्रभाकर उपाख्य बाबासाहेब अंधारे यांचे आज वृद्धापकाळाने हैदराबाद येथे निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

मनोहर अंधारे यांनी वृत्तपत्रीय क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. नागपूर श्रमिक पत्रकार संघ या नागपुरातील श्रमिक पत्रकारांच्या संघटनेच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. अखिल भारतीय पत्रकार महासंघाचेही ते पदाधिकारी होते. १९७८ ते १९८१ या काळात ते महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षही होते.

संघर्षशील व्यक्तिमत्त्व हरपले - फडणवीस

अंधारे यांच्या निधनाने पत्रकारितेतील एक संघर्षशील व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

पत्रकारांसाठी लढणारा योद्धा - राऊत

पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारा योद्धा व सव्यसाची पत्रकार गमावला आहे, अशा शब्दात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.

Web Title: Senior journalist Manohar Andhare passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.