शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत लवकरच फेरबदल

By admin | Updated: July 1, 2014 00:55 IST

शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख बदलण्यात आले आहे. खा. विनायकराव राऊत यांच्या जागी आता आ.डॉ. दीपक सावंत हे पूर्व विदर्भाचा कारभार पाहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,

संपर्कप्रमुख बदलले : शहर व जिल्हा कार्यकारिणी नव्याने होणार नागपूर : शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख बदलण्यात आले आहे. खा. विनायकराव राऊत यांच्या जागी आता आ.डॉ. दीपक सावंत हे पूर्व विदर्भाचा कारभार पाहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी शहर व जिल्हा कार्यकारिणीतही फेरबदल केले जाणार आहे. हा बदल जुलैच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात होईल. विनायकराव राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेला कोकण काबीज करायचे आहे. अशा परिस्थितीत राऊत यांना कोकणात अधिक वेळ देता यावा यासाठी त्यांच्याकडून पूर्व विदर्भाची जबाबदारी काढून हिंगोली व नांदेडची जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात डॉ. दीपक सावंत हे नागपुरात तळ ठोकून होते. लोकसभा निवडणुकीत गडकरी-उद्धव वादामुळे दुखावलेल्या शिवसैनिकांची नाराजी दूर करण्यात डॉ. सावंत यांनी मोलाची भूमिका बजावली होती. गेल्या निवडणुकीत रामटेकमध्ये पराभव झाल्यानंतरही यावेळी तुमाने यांनाच संधी द्यावी, ते जिंकतील, असा आग्रह त्यांनी पक्षनेतृत्वाकडे धरला होता. आपला आग्रह कितपत बरोबर होता, हे निकाल पाहता सिद्ध झाले. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पूर्व विदर्भाचे पालकत्व देण्याचा निर्णय घेतला. सावंत हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आहेत. विद्यमान जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे हे विनायकराव राऊत यांचे खासमखास आहेत. सावरबांधे यांचे नाव दक्षिण नागपूरसाठी सुरू आहे. अशात संघटनेत फेरबदल करताना जिल्हाध्यक्षपद दुसऱ्या व्यक्तीकडे सोपविले जाऊ शकते. माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, उपजिल्हा प्रमुख चंद्रहास राऊत व शहरप्रमुख मंगेश सरायकर यांचे नाव आघाडीवर आहे. सर्वांनी आपापल्या परीने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये नरखेडचे सभापती राजू हरणे व पांडुरंग बुराडे हे दोन जिल्हाप्रमुख आहेत. ग्रामीणची कार्यकारिणी काही दिवसांपूर्वीच तयार करण्यात आल्यामुळे तिला सध्याच हात लावला जाणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. काटोलमधून राजू हरणे यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या जागी दुसरा जिल्हाध्यक्ष नेमला जाऊ शकतो. (प्रतिनिधी)