‘आरएसएस’विरुद्धचे चर्चासत्र नागपुरातील भट सभागृहातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 21:33 IST2018-04-17T21:33:07+5:302018-04-17T21:33:17+5:30

कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध चर्चासत्र आयोजित करण्याची अनुमती मिळावी ही माजी नगरसेवक जनार्दन मून यांची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी मंजूर केली. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला.

The seminar against 'RSS' was to be hold at the Bhat hall in Nagpur | ‘आरएसएस’विरुद्धचे चर्चासत्र नागपुरातील भट सभागृहातच

‘आरएसएस’विरुद्धचे चर्चासत्र नागपुरातील भट सभागृहातच

ठळक मुद्देहायकोर्ट : जनार्दन मून यांची याचिका मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध चर्चासत्र आयोजित करण्याची अनुमती मिळावी ही माजी नगरसेवक जनार्दन मून यांची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी मंजूर केली. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला.
मून यांनी येत्या २९ एप्रिल रोजी चर्चासत्र आयोजित करण्यासाठी भट सभागृहाची मागणी केली होती. त्यासाठी अर्ज सादर केला होता. नियमानुसार कार्यक्रमाच्या ४५ दिवस आधी निर्धारित शुल्क जमा करणे आवश्यक असते. त्यानुसार त्यांनी १६ मार्च रोजी शुल्क देऊ केले असता क्रीडा अधिकाऱ्यांनी शुल्क स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी १७ मार्च रोजी मनपा आयुक्तांकडे तक्रार दिली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. मून यांना भट सभागृह देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता त्यांना दिलासा दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.

 

Web Title: The seminar against 'RSS' was to be hold at the Bhat hall in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.