लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुक्तालयात पोहचलेल्या धीरज रमेश चौरपगार नामक तरुणाने स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या तरुणाचे प्राण बचावले. पोलीस आयुक्तांनी नंतर धीरजचे समुपदेशन करून गिट्टीखदान पोलिसांना तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश दिले.गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलीस आयुक्तालय परिसरात काही वेळ चांगलीच खळबळ निर्माण केली होती.धीरज हा निवृत्त पोलीस अधिकारी रमेश चौरपगार यांचा मुलगा होय. तो उच्चशिक्षित आहे. गिट्टीखदानमध्ये पेन्शननगरात चौरपगार कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी एक जमीन विकत घेतली. बाजूला मकसुदखान नामक व्यक्ती राहते. चौरपगार आणि मकसुद राहत असलेल्या ठिकाणची जमीन रस्त्याला लागून आहे. त्यामुळे या जमिनीवर हे दोघेही मालकी हक्क सांगत असून, त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू आहे. त्यांच्यातील नेहमीच्या कुरबुरींना पोलिसांनी आता गांभीर्याने घेणे सोडले. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी दुपारी धीरज आणि मकसुदमध्ये वाद झाला. त्यानंतर धीरज गिट्टीखदान ठाण्यात पोहचला. त्याने मकसुदने आपल्याला मारहाण करून पैसे हिसकावून घेतल्याची तक्रार पोलीस उपनिरीक्षक राठोड यांना सांगितली. राठोड यांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे संतप्त झालेला धीरज सायंकाळी ५ च्या सुमारास पोलीस आयुक्तालयात पोहचला. त्याने हातातील बाटलीतील ज्वलनशील पदार्थ आपल्या अंगावर ओतून आरडाओरड सुरू केली. पोलीस आम्हाला न्याय देत नसल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे तो म्हणत होता. यावेळी आयुक्तालयातील तैनात पोलीस लगेच त्याच्याकडे धावले. त्यांनी धीरजला कसेबसे आवरले. या घटनेने आयुक्तालय परिसरात काही वेळ चांगलीच खळबळ निर्माण झाली. ही बाब पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना कळविण्यात आली. आयुक्त लगेच कार्यालयात पोहचले. त्यांनी धीरज आणि त्याच्या सोबतच्या व्यक्तीला कक्षात बोलवून घेतले. आयुक्तांनी धीरजची तक्रार ऐकून घेतली. त्यानंतर त्याचे समुपदेशन करून लगेच गिट्टीखदानचे ठाणेदार विनोद चौधरी यांना धीरजची तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर धीरजला आश्वस्त करीत गिट्टीखदान ठाण्यात पाठविले. ठाणेदार चौधरी यांनी धीरजची तक्रार ऐकून घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेतली.
आत्मदहनाचा प्रयत्न : सतर्क पोलिसांमुळे वाचले तरुणाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:56 IST
आयुक्तालयात पोहचलेल्या धीरज रमेश चौरपगार नामक तरुणाने स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या तरुणाचे प्राण बचावले. पोलीस आयुक्तांनी नंतर धीरजचे समुपदेशन करून गिट्टीखदान पोलिसांना तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश दिले.गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलीस आयुक्तालय परिसरात काही वेळ चांगलीच खळबळ निर्माण केली होती.
आत्मदहनाचा प्रयत्न : सतर्क पोलिसांमुळे वाचले तरुणाचे प्राण
ठळक मुद्देपोलीस आयुक्तांनी केले समुपदेशन