प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी मनिष जांभुळेची निवड 

By दयानंद पाईकराव | Updated: January 18, 2024 15:28 IST2024-01-18T15:28:37+5:302024-01-18T15:28:49+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या पथ संचलनासाठी राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) च्या वतीने विद्यापीठ स्तरावर निवड स्पर्धा आयोजित केली होती.

Selection of Manish Jambule for the Republic Day Parade | प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी मनिष जांभुळेची निवड 

प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी मनिष जांभुळेची निवड 

नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संताजी महाविद्यालयाचा विद्यार्थी मनीष संजय जांभुळे याची निवड झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पथ संचलनासाठी राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) च्या वतीने विद्यापीठ स्तरावर निवड स्पर्धा आयोजित केली होती. यात मनीष संजय जांभुळे याची निवड झाली आहे.

मनीषची निवनड झाल्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, संताजी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया वंजारी, एनसीसीचे समन्वयक प्रा. डॉ. संजय खळतकर यांनी मनिषचे कौतुक केले आहे.

Web Title: Selection of Manish Jambule for the Republic Day Parade

टॅग्स :nagpurनागपूर