लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : पाेलिसांनी गस्तीदरम्यान अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून कार व शस्त्र असा एकूण ७ लाख ३५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई खापरखेडा (ता. सावनेर) परिसरात गुरुवारी (दि. ११) रात्री ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
प्रदीप अभिमन्यू साखरे (३२,रा. वाघाेडा, ता. सावनेर), राहुल याेगेश भंडारे (२२, रा. काेच्छी बडेगाव, ता. सावनेर) व कृष्णकुमार श्रीचंद वर्मा (३१, रा. दत्तनगर, चनकापूर, ता. सावनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. खापरखेडा पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना एमटी-२८/सीए-३५५९ क्रमांकाची कार जाताना दिसली. संशय आल्याने पाेलिसांनीही कार थांबवून झडती घेतली. त्यात पाेलिसांना कारमध्ये चाकू आढळून आला. त्यामुळे पाेलिसांनी तिघांनाही अटक करीत त्यांच्याकडून सात लाख रुपये किमतीची कार आणि ३५० रुपये किमतीचा चाकू असा एकूण ७ लाख ३५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार उमेश ठाकरे करीत आहेत.