शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

सिकंदराबाद-दानापूर व्हाया नागपूर ट्रेन आजपासून; प्रवाशांना दिलासा

By नरेश डोंगरे | Published: April 26, 2024 9:02 PM

उन्हाळ्याची गर्दी : २० अतिरिक्त स्पेशल ट्रेन

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : रेल्वेतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी मध्य रेल्वेने आणखी २० अतिरिक्त उन्हाळी स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील सिकंदराबाद-दानापूर ही स्पेशल ट्रेन नागपूरमार्गे धावणार आहे.

उन्हाचा पारा आणि प्रवाशांची गर्दी सारखी वाढत असल्याचे पाहून प्रशासनाने वेगवेगळ्या मार्गावरच्या रेल्वेगाड्या नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावरून युपी, बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये जास्त गर्दी होत असल्याचे पाहून यापूर्वी नागपूर-गोरखपूर ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. तर आता सिकंदराबाद-दानापूर ही स्पेशल ट्रेन उन्हाळ्यात चालविण्यात येणार आहे. ती नागपूर मार्गे दानापूरला चालविली जाणार आहे. जाण्याच्या १० आणि येण्याच्या १० अशा एकूण २० फेऱ्या ही गाडी लावणार आहे. पहिली फेरी शनिवारी २७ एप्रिलला होणार आहे.असे राहील वेळापत्रक

ट्रेन नंबर ०७६४७ स्पेशल सिकंदराबाद येथून २७ एप्रिल २०२४ ते २९ जून २०२४ पर्यंत दर शनिवारी रात्री ९ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ७:२५ वाजता ती नागपूरला पोहोचेल. येथून ७:३० ला सुटल्यानंतर सोमवारी पहाटे ५:५० वाजता दानापूरला पोहोचेल.

त्याचप्रमाणे ट्रेन नंबर ०७६४८ दानापूर-नागपूर-सिकंदराबाद ही स्पेशल ट्रेन २९ एप्रिल २०२४ ते १ जुलै २०२४ पर्यंत दर सोमवारी दानापूर येथून सकाळी ८ वाजता सुटेल. ती मंगळवारी सकाळी ८:५५ वाजता नागपूरला पोहोचेल. येथून सकाळी ९:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सिकंदराबादला रात्री ७ वाजता पोहोचेल.असे राहतील थांबे

या दोन्ही विशेष गाड्यांचे थांबे जानगाव, काझीपेठ, पेड्डापल्ली, रामागुंडम, सिरपूर कागजनगर, बल्लारशाह, नागपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी जंक्शन, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी आणि पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन या स्थानकांवर राहील. या गाड्यांना एक फर्स्ट, दोन टू टायर एसी, सहा थ्री टायर एसी, १० स्लीपर क्लास आणि दोन जनरल सेकंड क्लास कोच राहणार आहेत. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर