शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या नाराज माजी नगरसेवकांची छुपी मोहीम, २५ जागा येणार धोक्यात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 20:20 IST

कार्यकर्त्यांना उमेदवारांसाठी काम करू नका, अशा दिल्या सूचना : विरोधकांना मदतीची सूट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका निवडणुकीत भाजपने ५१ माजी नगरसेवकांचे तिकीट कापत उमेदवारी नाकारली. यामुळे नाराज झालेल्या बऱ्याच माजी नगरसेवकांनी आता भाजप उमेदवारांविरोधात छुपी मोहीम सुरू केली आहे. पक्षाच्या उमेदवारांचे जोरात काम करू नका, सभा, बैठकांना गर्दी जमवू नका, प्रचारात खूप सक्रिय राहू नका, शक्य असेल तर पडद्यामागून विरोधी उमेदवाराला थेट मदत करा, अशा सूचना या नाराज माजी नगरसेवकांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. यामुळे बऱ्याच प्रभागात भाजपचा प्रचारच बसला असून, याचा फटका सुमारे २५ जागांवर बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.

भाजपने महापालिकेत 'मिशन १२०'चा नारा दिला आहे. शहरातील १५१ पैकी १०५ जागांवर महायुतीकडून नवीन उमेदवार देण्यात आले. युतीकडून बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांना थेट एबी फॉर्मचे वाटप केले आणि ५१ माजी नगरसेवकांच्या नावावर फुली मारण्यात आली. माजी नगरसेवकांची निष्क्रियता आणि जनतेमध्ये त्यांच्याबाबत असलेला रोष यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. पक्षासाठी इतके वर्षे राबूनही तिकीट नाकारल्यामुळे या ५१ पैकी अनेक जण नाराज झाले पक्षनेत्यांसमोर काहींनी उघड नाराजीही व्यक्त केली. बहुतांश जणांनी बंडखोरी करण्याचे टाळले मात्र, जवळपास काही माजी नगरसेवकांनी विद्यमान उमेदवारांविरोधातच छुपी मोहीमा सुरू केली आहे. त्यांचे समर्थक तसेच प्रभागातील नागरिकांमध्ये संबंधित माजी नगरसेवकावर अन्याय झाला असून, नवीन उमेदवाराविरोधात वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे.

बाहेरील उमेदवार का थोपविला?

मुख्यमंत्र्यांचाच मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरातील एका माजी नगरसेवकाने तर 'लोकमत'सोबत बोलताना थेट ही बाब बोलून दाखविली. मी माझ्या प्रभागाचा आजवर झाला नाही, इतका विकास केला. मात्र, बाहेरील प्रभागातील व्यक्तीची उमेदवारी आमच्यावर थोपविण्यात आली. ही बाब नागरिकांनाही खटकत आहे आणि निश्चितपणे याचा पक्षाला फटका बसेल, अशी संतप्त प्रतिक्रिया संबंधित माजी नगरसेवकाने बोलून दाखविली. अनेक माजी नगरसेवकांचा असाच सूर असून, पक्षनेत्यांनी शब्द देऊनही उमेदवारी दिलेली नाही. अशा स्थितीत आमची काय क्षमता आहे हे दाखवून देण्याची गरज आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रभागाबाहेरील उमेदवारांसमोरील आव्हाने निश्चित वाढणार आहेत.

या माजी नगरसेवकांना बसला होता धक्का

भाजपने मागील काही कालावधीतील सर्वेक्षण अहवाल, सक्रियता आणि मुलाखती यांच्या आधारावर तिकिटांचे वाटप केले. त्यात अनेक माजी नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले आणि त्यांना इतर कुठूनही संधी देण्यात आली नाही. त्यात नंदा जिचकार, सरला नायक, शकुंतला पारवे, नसीमबानो खान, प्रवीण भिसीकर, अर्चना पाठक, अमर बागडे, वर्षा ठाकरे, उज्ज्वला शर्मा, संजय बंगाले, शिल्पा थोटे, योगीता तेलंग, प्रमोद कौरती, लता काडगाए, सुमेधा देशपांडे, नेहा वाघमारे, यशश्री नंदनवार, दीपराज पार्डीकर, महेश महाजन, ज्योती भिसीकर, राजेश घोडपागे, वंदना यंगटवार, श्रद्धा पाठक, मनोज चापले, मनीषा धावडे, अनिल गेंद्रे, चेतना टांक, वैशाली रोहनकर, मनीषा कोठे, समिता चकोले, वंदना भुरे, हरीष दिकोंडवार, रेखा साकोरे, भगवान मेंढे, स्वाती आखतकर, नागेश सहारे, रिता मुळे, उषा पॅलेट, शीतल कामडे, अभय गोटेकर, वंदना भगत, राजेंद्र सोनकुसरे, माधुरी ठाकरे, जयश्री वाडीभस्मे, अविनाश ठाकरे, पल्लवी शामकुळे, लहुकुमार बेहते, प्रकाश भोयर, प्रमोद तभाने, सोनाली कडू यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP ex-corporators' silent revolt threatens 25 seats in Nagpur.

Web Summary : Disgruntled BJP ex-corporators in Nagpur are allegedly sabotaging party candidates after being denied tickets. This covert operation, involving discouraging support and potentially aiding rivals, may jeopardize approximately 25 seats in the upcoming municipal elections, impacting BJP's 'Mission 120'.
टॅग्स :Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६nagpurनागपूरBJPभाजपा