सलग दुसऱ्या दिवशी शहरातील रुग्णसंख्या ५०० च्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST2021-05-23T04:08:09+5:302021-05-23T04:08:09+5:30

नागपूर : कोरोनाच्या संकटाने सगळ्यांचीच वाढविलेली चिंता आता कमी होताना दिसून येत आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या ५०० ...

For the second day in a row, the number of patients in the city was less than 500 | सलग दुसऱ्या दिवशी शहरातील रुग्णसंख्या ५०० च्या आत

सलग दुसऱ्या दिवशी शहरातील रुग्णसंख्या ५०० च्या आत

नागपूर : कोरोनाच्या संकटाने सगळ्यांचीच वाढविलेली चिंता आता कमी होताना दिसून येत आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या ५०० च्या आत होती. शनिवारी शहरात ४४५ रुग्ण व ७ मृत्यू तर ग्रामीणमध्ये ६३१ रुग्ण व ९ मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या १०८६, मृत्यूची संख्या २६ झाली. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक, २,८७२ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९४.९० टक्क्यांवर पोहचले आहे.

नागपूर जिल्ह्यात शनिवारी आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजन मिळून १९,६३७ चाचण्या झाल्या. यात शहरात १३,७२२ तर ग्रामीणमध्ये ५,९१५ झाल्या. चाचण्यांच्या तुलनेत शहरात पॉझिटिव्हिटीचे प्रमाण ३.२४ टक्के, ग्रामीणमध्ये १०.६६ टक्के होते. विशेष म्हणजे, पहिली लाट नोव्हेंबरपासून ओसरू लागल्यानंतर पहिल्यांदाच ११ फेब्रुवारी रोजी रुग्णांची संख्या ५०० झाली. त्यानंतर रुग्णसंख्या वाढतच गेली. फेब्रुवारी महिन्यात ११८१ हा दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक होता. मार्च महिन्याची सुरुवातच हजारावर रुग्णाने झाली. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्या ३,५०० ते ४,००० च्या घरात गेली. या महिन्यात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद २६ मार्च रोजी झाली. ४,०९५ रुग्ण आढळून आले होते. एप्रिल महिन्यात तर रुग्णसंख्येचे जुने सर्व विक्रम मोडित निघाले. ६,५०० ते ७,५०० दरम्यान रुग्णांची भर पडत होती. यामुळे चिंतेचे गंभीर वातावरण तयार झाले होते. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला.

-आठवडाभरात ७,९०७ रुग्ण, २२४ मृत्यूची भर

आठवडाभरात नागपूर जिल्ह्यात ७,९०७ रुग्ण व २२४ मृत्यूची भर पडली. या आठवड्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद १९ मे रोजी झाली. १३७७ रुग्ण आढळून आले होते तर, सर्वाधिक मृत्यूची नोंद १८ मे रोजी झाली. या दिवशी ४१ रुग्णांचे मृत्यू झाले. मागील तीन दिवसापासून दैनंदिन रुग्णसंख्या हजाराजवळ आली आहे. मागील काही दिवसापासून शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

- १६ ते २२ मे दरम्यान रुग्ण व मृत्यूसंख्या

१६ मे : ११३३ रुग्ण : ३० मृत्यू

१७ मे : ९७१ रुग्ण : ३० मृत्यू

१८ मे : ११८९ रुग्ण : ४१ मृत्यू

१९ मे : १३७७ रुग्ण : ३६ मृत्यू

२० मे : ११५१ रुग्ण : २८ मृत्यू

२१ मे : १००० रुग्ण : ३३ मृत्यू

२२ मे : १०८६ रुग्ण २६ मृत्यू

:: कोरोनाची शनिवारची स्थिती

दैनिक चाचण्या: १९,६३७

शहर : ४४५ रुग्ण व ७ मृत्यू

ग्रामीण : ६३१ रुग्ण व ९ मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,७०,०१७

ए. सक्रिय रुग्ण : १५,२४२

ए. बरे झालेले रुग्ण : ४,४६,०३१

ए. मृत्यू : ८,७४४

Web Title: For the second day in a row, the number of patients in the city was less than 500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.