अयोध्यानगरातील ‘रावण’चा शोध लागेना !

By Admin | Updated: January 26, 2017 02:28 IST2017-01-26T02:28:25+5:302017-01-26T02:28:25+5:30

सक्करदरा परिसरात महिलांवर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

The search for 'Ravana' in Ayodhya Nagar! | अयोध्यानगरातील ‘रावण’चा शोध लागेना !

अयोध्यानगरातील ‘रावण’चा शोध लागेना !

पोलिसांनी केला गुन्हा दाखल : कुठे लपलाय ?
नागपूर : सक्करदरा परिसरात महिलांवर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोकमतने हे प्रकरण समोर आणल्यानंतर पोलिसांनी लगेच ही कारवाई केली. दत्तात्रयनगर व अयोध्यानगरात रस्त्यावर चालत असलेल्या महिलांवर हा तरुण अचानक धारदार शस्त्राने हल्ला करून दुचाकीने पसार झाला होता. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस घटनास्थळी येऊन गेले. परंतु आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
बुधवारी लोकमतमध्ये याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच पोलीस सक्रिय झाले. त्यांनी प्रेमलता भोयर नामक महिलेच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला. प्रेमलता या १९ जानेवारी रोजी दुचाकीने मेडिकल स्टोर्समधून परत येत असताना दत्तात्रयनगरात मागून स्कूटीवर आलेल्या आरोपीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात प्रेमलता जखमी झाल्या होत्या. अखेर त्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु पोलिसांना अद्याप आरोपीबाबत कुठलाही सुगावा लागलेला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्लेखोराने अनेक महिलांवर अशा प्रकारचा हल्ला केला असून तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The search for 'Ravana' in Ayodhya Nagar!