लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या एनडीएस जवानांनी शनिवारी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने गांधीबाग झोनमधील गांजाखेत चाैकातील बॉम्बे एंटरप्राजेसला सील ठोकले, तर २५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ७४ हजारांचा दंड वसूल केला. पथकाने ४८ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली.
लक्ष्मीनगर झोनअंतर्गत तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजारांचा दंड करण्यात आला. धरमपेठ विभागांतर्गत पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ३५ हजार, धंतोलीच्या पथकाने नऊ दुकानांची तपासणी करून १४ हजारांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनमध्ये तीन प्रतिष्ठानांकडून २० हजार, नेहरूनगर येथे तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये, गांधीबाग येथे सात प्रतिष्ठानांची तपासणी करून ३० हजार रुपये, सतरंजीपुरा येथे दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये, लकडगंजमध्ये तीन दुकानांची तपासणी करून २० हजार, आशी नगर पथकाने दहा प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजारांचा, तर मंगळवारी झोन पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोध पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.