शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

मुलांभोवती स्क्रब टायफसचा विळखा : रुग्णांची संख्या गेली ५२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:56 IST

टायफाईड, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस, चिकनगुनिया किंवा मलेरियासारख्या आजाराशी साम्य असलेल्या ‘स्क्रब टायफस’चा विळखा मुलांभोवती वाढत आहे. सोमवारी पाऊणे तीन वर्षांची चिमुकली पॉझिटिव्ह आली असताना मंगळवारी पुन्हा १० वर्षीय मुलाला हा रोग झाल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे, आज आठ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ५२ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देदहा वर्षीय मुलामध्ये रोगाचे निदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टायफाईड, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस, चिकनगुनिया किंवा मलेरियासारख्या आजाराशी साम्य असलेल्या ‘स्क्रब टायफस’चा विळखा मुलांभोवती वाढत आहे. सोमवारी पाऊणे तीन वर्षांची चिमुकली पॉझिटिव्ह आली असताना मंगळवारी पुन्हा १० वर्षीय मुलाला हा रोग झाल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे, आज आठ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ५२ वर पोहचली आहे.‘चिगर माईट्स’ किटाणुंमुळे पसरणारा ताप म्हणजे ‘स्क्रब टायफस’ सध्यातरी नियंत्रणात नसल्याचे चित्र आहे. साधारणपणे डोकेदुखी, अस्वस्थता आणि भूक कमी लागण्यापासून सुरुवात होणाऱ्या या रोगाचे वेळीच निदान व उपचार न झाल्याने आतापर्यंत १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्रयोगशाळेत ‘पॉझिटिव्ह’ आलेल्या आठ नव्या रुग्णांत अमरावती येथील १० वर्षीय चिमुकल्याचाही समावेश आहे. या रुग्णावर मेडिकलच्या बालरोग विभागातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. तर सोमवारी निदान झालेल्या पाऊणे तीन वर्षीय चिमुकलीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.एकट्या मेयोमधील चार रुग्ण पॉझिटिव्हइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) स्क्रब टायफस संशयित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल मंगळवारी उपलब्ध झाला. यातील तब्बल चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांवर औषधोपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.आठ रुग्णांमध्ये चार रुग्ण नागपूर ग्रामीणमधीलमंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या स्क्रब टायफसच्या आठ रुग्णांमध्ये चार रुग्ण हे नागपूर ग्रामीणमधील आहे. यात कोराडी येथील ५४ वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगर महादुला कोराडी येथील २० वर्षीय पुरुष, सालईखुर्द येथील ५५ वर्षीय महिला व मौदा तारसा येथील ६० वर्षीय महिलेचा समोवश आहे. या शिवाय, मध्य प्रदेशातील ५५ वर्षीय पुरुष, गोंदिया येथील २० वर्षीय महिला, भंडारा येथील ४५ वर्षीय पुरुष व अमरावती येथील १० वर्षीय मुलाचा समावेश असून यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.ताप असल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवाडोकेदुखी, थंडी वाजून तीव्र ताप येणे, मळमळणे, सुस्ती येणे, शरीरात कंप सुटणे, लसिक गाठीमध्ये सूज येणे, सांधेदुखी, कोरडा खोकला, न्युमोनियासदृश आजार, ‘चिगर’ कीटक चावल्याने खाज व अंगावर चट्टे येणे आणि चिगरदंश झालेल्या ठिकाणी जखम होऊन खपली येणे, ही या रोगाची लक्षणे आहेत. लवकर उपचार घेतल्यास हा रोग पूर्णत: बरा होतो. यामुळे साधा ताप असलातरी अंगावर काढू नका, डॉक्टरांना दाखवा. मुलांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. डॉ. दीप्ती जैनप्रमुख, बालरोग विभाग, मेडिकल.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयHealthआरोग्य