शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

भंगार बसचा लिलाव रखडला  : २२८ भंगार बसेस पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:14 IST

भंगार बस विक्री केल्यास यातून अपेक्षित रकमेवर चर्चा झाली. परंतु उपसमितीला अध्यक्ष नसल्याने भंगार बसचा लिलाव करण्याची प्रक्रिया रखडली आहे.

ठळक मुद्देउपसमितीला अध्यक्षाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या परिवहन सेवेतून बाद झालेल्या २२८ भंगार बसचा लिलाव करण्यासाठी वर्षभरापूर्वी परिवहन समितीची उपसमिती गठित करण्यात आली होती. समितीच्या अनेकदा बैठका झाल्या. भंगार बस विक्री केल्यास यातून अपेक्षित रकमेवर चर्चा झाली. परंतु उपसमितीला अध्यक्ष नसल्याने भंगार बसचा लिलाव करण्याची प्रक्रिया रखडली आहे.भंगार बसचा लिलाव करण्यासाठी परिवहन समितीचे माजी सदस्य प्रवीण भिसीकर यांच्या अध्यक्षतेखाली तीनसदस्यीय उपसमिती गठित करण्यात आली होती. सदस्यात नितीन साठवणे व अर्चना पाठक यांचा समावेश होता. परंतु भिसीकर यांचा कालावधी संपल्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही. उपसमितीने भंगार बसच्या लिलाव प्रक्रि येसंदर्भात वेळोवेळी बैठका घेऊ न परिवहन विभागाला सूचना केल्या. परंतु लिलावाची प्रक्रिया पुढे सरकली नाही.हिंगणा व टेका नाका येथे महापालिकेच्या भंगार बसेस उभ्या आहेत. या दोन्ही ठिकाणी बसेसच्या सभोवताल गवत व झुडपे वाढलेली आहेत. लिलावाला विलंब होत असल्याने बसचे मूल्य दिवसेंदिवस कमी होत आहे. लिलाव प्रक्रिया पारदर्शी व्हावी, यासाठी यासाठी राज्य परिवहन महामंडळातील अधिकाऱ्यांना या प्रक्रियेमध्ये सहभागी करण्यासंदर्भात प्रशासकीय मान्यता घेण्याचे निर्देश उपसमितीने दिले होते. मात्र ही प्रक्रिया थंडावली आहे.बसचे बाजारमूल्य ठरविण्याला विलंबभंगार बसेस लिलावात काढण्याआधी त्यांची परिवहन नोंदणी रद्द करणे आवश्यक होते. त्यानुसार नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया करण्यात आली. परंतु अजूनही काही बसेसची नोंदणी रद्द करण्यात आलेली नाही. नोंदणी रद्द के ल्यानंतर बसचे आजचे बाजारमूल््य काढून लिलाव करावा लागणार आहे. यासंदर्भात अनेकदा बैठका झाल्या. उपसमितीने वेळोवेळी निर्देश दिले. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही.शौचालय वा व्यवसासाठी वापर नाहीबचत गटाच्या महिलांना भंगार बस व्यवसायासाठी उपलब्ध करण्याची संकल्पना पुढे आली होती. तसेच वर्दळीच्या भागात महिलांसाठी शौचालयासाठी या बसचा वापर करण्यावर विचार सुरू होता. अद्याप दोन्ही प्रस्ताव कागदावरच आहे. नियोजनाचा अभाव व इच्छाशक्ती नसल्याने मागील काही वर्षापासून भंगार बसेस वापराविना पडून आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका