शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या पाण्यात सातजण असलेली स्कॉर्पिओ गेली वाहून, तिघांचे मृतदेह सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2022 17:56 IST

सावनेर तालुक्यातील नांदागोमुख-छत्रापूर मार्गावरील नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न करताच स्कॉर्पिओ पुराच्या प्रवाहात वाहून गेली.

सुनील चरपे

नागपूरनुकतचं हिंगणा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे इसासनी परिसरातील नाल्याला आलेल्या पुरात माय-लेकी वाहून गेल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच, आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावनेर तालुक्यात एका नाल्यावरून सात जण गाडीसहित वाहून गेले. 

जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. सततच्या पावसाने नदी-नाले तुडूंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूर परिस्थी आहे. अशातच, सावनेर तालुक्यातील नांदा ते छत्रपूर दरम्यानच्या नाल्यावरून पाणी वाहत असताना गाडी काढण्याच्या नादात ती गाडी ७ जणांसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. ही घटना आज (दि. १२) दुपारी ३ च्या सुमारास घडली. त्या स्काॅर्पिओमध्ये तीन महिला, दाेन पुरुष, १० वर्षाचा मुलगा व वाहनचालक असे एकूण सात जण असल्याची तसेच यातील दाेन महिला व एका एक पुरुष अशा तिघांचे मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. ते सर्व जण मुरुड, ता. मुलताई, जिल्हा बैतूल (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत. 

नांदागाेमुख, ता. सावनेर येथील सुरेश ढाेके यांच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी लग्न झाल्याने ते सर्व जण सुरेश ढाेके यांच्याकडे व्याही भाेजनासाठी आले हाेते. भाेजन आटाेपल्यानंतर पाऊस सुरू असताना ते स्काॅर्पिओने (एमएच-३१/सीपी-०२९९) मुलताईकडे जायला निघाले. दरम्यान, नांदागाेमुख-छत्रापूर मार्गावरील माेठ्या नाल्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना चालकाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. स्काॅर्पिओ काही दूर जाताच प्रवाहात अडकली आणि वाहून गेली. माहिती मिळताच केळवद पाेलिसांनी घटनास्थळ गाठून शाेधकार्य सुरू केले.

टॅग्स :AccidentअपघातRainपाऊसfloodपूरnagpurनागपूरDeathमृत्यू