शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू झाल्या, मात्र वीज पुरवठा खंडितच राहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:12 IST

शिक्षणाचे गांभीर्य आता शासन आणि प्रशासनाला राहिलेले नाही. वृत्तपत्राच्या माध्यमातून जि.प.च्या शाळांच्या खंडित वीज पुरवठ्याबद्दल वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा २६ जूनपासून सुरू झाल्या. मात्र आजही विजेअभावी त्या अंधारलेल्या आहेत. शाळांचे थकलेले वीज बिल भरण्यात आले नसल्याने शाळांमध्ये अंधार कायम आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा अंधारात असतानाही लोकप्रतिनिधीही त्याबाबत गंभीर नाही.

ठळक मुद्देनागपूर जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था : लोकप्रतिनिधीही गंभीर नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शिक्षणाचे गांभीर्य आता शासन आणि प्रशासनाला राहिलेले नाही. वृत्तपत्राच्या माध्यमातून जि.प.च्या शाळांच्या खंडित वीज पुरवठ्याबद्दल वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा २६ जूनपासून सुरू झाल्या. मात्र आजही विजेअभावी त्या अंधारलेल्या आहेत. शाळांचे थकलेले वीज बिल भरण्यात आले नसल्याने शाळांमध्ये अंधार कायम आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा अंधारात असतानाही लोकप्रतिनिधीही त्याबाबत गंभीर नाही.जिल्हा परिषदेच्या सुमारे १५३८ वर शाळा आहेत. शासनाने शाळांमध्ये डिजिटल तंत्रज्ञाना पुरविले आहे. पण वीज पुरवठाच नसेल तर डिजिटल तंत्रज्ञान वापरणार कसे, हा प्रश्नच आहे. आजच्या घडीला जि.प.च्या शेकडो शाळांमध्ये अंधार पसरला आहे. नागपूर जिल्हा राजकीय पटलावर नेतृत्व करीत आहे. पण येथील शिक्षणाची अवस्था लक्षात घेता, वरिष्ठ राजकीय नेतृत्वाच्या कार्यशैलीकडे बोट दाखविणारी आहे.वीज पुरवठा खंडित असलेल्या शाळांची आकडेवारी असतानाही जि.प.च्या अर्थसंकल्पनात थकीत वीज बिल भरण्यासंदर्भात कुठलीही तरतूद केलेली नाही. मार्च महिन्यात जि.प.च्या जवळपास ३२२ शाळांमधील वीज पुरवठा हा थकीत वीज देयकापोटी खंडित करण्यात आला होता. यानंतर काही शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक यांनी स्वखचार्तून हे वीज देयक भरले. मात्र अजूनही शेकडोवर शाळांनी आजही थकीत वीज देयक भरले नाही. थकीत वीज देयक असलेल्या शाळांची माहितीही सादर केली नाहीसदर वीज देयक माफ करण्यासाठी २०१८-१९ व २०१९-२० ची थकित देयकाची माहिती ग्राम विकास विभागाने मागितली होती. या विषयावर राज्याचे शालेय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येणार असल्यामुळे नागपूर जि.प.प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी ३ जुलै रोजी पत्रक काढून सर्व गटशिक्षणाधिकारी यांना तालुक्यातील शाळांवर असलेल्या थकीत देयकाची माहिती ४ जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून ही माहितीच आली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरSchoolशाळाPower Shutdownभारनियमन