Schoolgirl raped in Nagpur | नागपुरात  शाळकरी मुलीवर बलात्कार
नागपुरात  शाळकरी मुलीवर बलात्कार

ठळक मुद्देइमामवाड्यात गुन्हा : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेजारच्या आरोपीने एका शाळकरी मुलीवर पाशवी बलात्कार केला. ही घटना कुणाला सांगितल्यास जीवे मारेन, अशी धमकी दिली. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. निखिल शाम जवादे (वय २८, रा. इमामवाडा) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी दहावीत शिकते. तिचे आईवडील मोलमजुरी करतत. ती जेथे शिकवणी वर्गाला जायची तेथे आरोपी निखिल जवादे हा उभा राहत होता. तो तिचा नेहमी पाठलाग करायचा. त्याने मुलीच्या मैत्रिणीकडून तिचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर तो मोबाईलवरून तिच्यासोबत चॅटिंग करायचा. ११ आॅक्टोबरला रात्री ९ वाजता ती शिकवणी वर्गातून घरी येत असताना त्याने तिला रस्त्यात गाठले. तू मला खूप आवडते, तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्टहले. तिने नकार दिला असता दमदाटी करीत तिला दुचाकीवरून स्वत:च्या घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, ती घरी परतल्यानंतर तिला उशिरा येण्याचे कारण विचारून आईने रागावले. ती यावेळी गप्प राहिली. आपण केलेल्या कुकृत्याची मुलीने वाच्यता न केल्यामुळे तो निर्ढावला. तिला वारंवार रस्त्यात गाठून बदनामीची धमकी देऊन शारीरिक संबंधासाठी मागणी करू लागला. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दोघीही मायलेकी पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.


Web Title: Schoolgirl raped in Nagpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.