शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या  आरोपीला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 10:09 PM2017-12-21T22:09:23+5:302017-12-21T22:10:28+5:30

सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या  एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.टी. भालेराव यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि ७५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Schoolgirl molestation case : Accused convicted | शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या  आरोपीला कारावास

शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या  आरोपीला कारावास

Next
ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निकाल : नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

आॅनलाईन लोकमत
नागपूर : सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या  एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.टी. भालेराव यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि ७५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
मंगेश मधुकर दुरुगवार (२३), असे आरोपीचे नाव असून तो कळमेश्वर तालुक्यातील हरदोली येथील रहिवासी आहे.
प्रकरण असे की, १० मे २०१४ रोजी रात्री ११ वाजताच्या पीडित मुलगी ही शौचास गेली होती. घराकडे परततेवेळी आरोपीने तिला गाठले होते. अतिप्रसंग करण्याच्या हेतूने तिला ओढत त्याने झुडपात नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पीडित मुलीने स्वत:ची अब्रू वाचविण्यासाठी जबरदस्त प्रतिकार केला होता. झटापटीत मुलगी जखमी झाली होती. त्याच्या तावडीतून तिने कशीबशी स्वत:ची सुटका करून स्वत:चे घर गाठल्यानंतर घडलेली घटना आपल्या घरच्यांना सांगितली होती. प्राप्त तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी भादंविच्या ३५४-ए, ५०६ आणि ३२३ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपीला अटक करण्यात आली होती. हेड कॉन्स्टेबल तिल्लोत्तम देवगडे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला भादंविच्या ३५४-ए कलमांतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, ५०६ कलमांतर्गत एक वर्ष कारावास, २५० रुपये दंड आणि ३२३ कलमांतर्गत १ वर्ष कारावास, अशी शिक्षा सुनावली. आरोपीला या सर्व शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील माधुरी मोटघरे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. मिराशे यांनी काम पाहिले.

Web Title: Schoolgirl molestation case : Accused convicted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.