शाळकरी मुलीची सोशल मीडियावर बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 10:04 IST2019-06-03T10:04:06+5:302019-06-03T10:04:58+5:30
एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या एका युवकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने शाळकरी मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार केले. त्यावर लज्जास्पद मेसेज आणि फोटो अपलोड करून ते व्हायरल केल्याची घटना उजेडात आली आहे.

शाळकरी मुलीची सोशल मीडियावर बदनामी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या एका युवकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने शाळकरी मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार केले. त्यावर लज्जास्पद मेसेज आणि फोटो अपलोड करून ते व्हायरल केल्याची घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकाने दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपी कासिफ खान (वय १८, रा. अवस्थीनगर) तसेच त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आरोपी कासिफ आणि पीडित मुलगी (वय १५) एकाच वस्तीत राहतात. ती दहावीची विद्यार्थिनी आहे. आरोपीच्या प्रेमाला तिने प्रतिसाद दिला नाही म्हणून कासिफने तिच्या नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले. त्यावर तिचा कटपेस्ट केलेला डीपी ठेवला अन् त्या माध्यमातून अश्लील मेसेज तसेच फोटो व्हायरल केले. १८ आॅक्टोबर २०१८ पासून आरोपीने सुरू केलेला हा उपद्रव १० मे २०१९ ला लक्षात आला. त्यामुळे मुलीच्या पालकांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सायबर शाखेच्या मदतीने तपास केला असता आरोपी कासिफ आणि त्याच्या साथीदारांनी हे कुकृत्य केल्याचे उघड झाले. त्यावरून त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचे कलम ३५४ तसेच आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.