नागपुरात मोबाईलसाठी शाळकरी मुलीने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:47 IST2018-05-30T23:47:21+5:302018-05-30T23:47:35+5:30

मोबाईलवर खेळण्यास रागावल्यामुळे एका १३ वर्षीय मुलीने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कोराडी महादुला येथे घडली.

School girl committed suicide for mobile in Nagpur | नागपुरात मोबाईलसाठी शाळकरी मुलीने घेतला गळफास

नागपुरात मोबाईलसाठी शाळकरी मुलीने घेतला गळफास

ठळक मुद्देआईने हिसकावला होता मोबाईल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोबाईलवर खेळण्यास रागावल्यामुळे एका १३ वर्षीय मुलीने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कोराडी महादुला येथे घडली.
प्रीतल चंद्रमणी गोंडाणे (१३) रा. मानवनगर महादुला असे मृत मुलीचे नाव आहे. ती आठव्या वर्गात शिकत होती. सोमवारी सकाळी १०.३० वाजता प्रीतल मोबाईलवर खेळत होती. तिच्या आईने तिला मोबाईलवर जास्त खेळण्यास मनाई करीत मोबाईल हिसकावून घेतला. यामुळे रागाच्या भरात प्रीतल आपल्या खोलीत निघून गेली. तिथे तिने ओढणीने गळफास घेतला. घरच्यांच्या लक्षात येताच तिला मानकापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. कोराडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
इमामवाड्यात युवकाची आत्महत्या
जाटतरोडी इमामवाडा येथील ३० वर्षीय युवक मुकेश रतन गिरे याने गळफास घेतला. मंगळवारी रात्री ८.३० वाजता मुकेश फासावर लटकलेला आढळून ाल राजेश गिरे यांच्या सूचनेवरून इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: School girl committed suicide for mobile in Nagpur