शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

शाळा दत्तक योजना विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी धोकादायक, शिक्षक समितीचा आरोप

By गणेश हुड | Updated: September 22, 2023 16:43 IST

शासनाकडे निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी

नागपूर : राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उद्योजकांना दत्तक देण्याचा निर्णय भविष्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे या निर्णयाचा शासनाने पुनर्विचार करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस निळकंठ लोहकरे यांच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांना  निवेदन दिले.

शिक्षण हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार बालकांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी ही शासनाची आहे. प्राथमिक शिक्षणाकरिता सकल उत्पन्नाच्या सहा टक्के तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात न करता शिक्षणाची जबाबदारी उद्योग समूहावर सोपविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

उद्योग समूहाला शाळा दत्तक दिल्यास दुर्गम भागातील, वाडी वस्ती व तांड्यावरील कमी पटसंख्येच्या शाळा बंद पडतील. भविष्यात उद्योग समूहांची शिक्षण क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण होईल. त्यामुळे शासनाचा हा निर्णय म्हणजे शिक्षणाच्या खाजगीकरणाची सुरुवात ठरेल अशी शंका शिक्षक समितीने व्यक्त केली आहे. शिष्टमंडळात शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे, निळकंठ लोहकरे, अनिल नासरे, प्रकाश सव्वालाखे, उज्ज्वल रोकडे, विजय उमक, प्रकाश जाधव आदींचा समावेश होता.

कंत्राटी नोकर भरती म्हणजे वेठबिगारी

कंत्राटी पद्धतीने नोकरभरती म्हणजे वेठबिगारी पद्धत निर्माण करणारी आहे. लोकशाही मूल्य व संवैधानिक तत्त्वांना हरताळ फासणारी आहे. त्यामुळे नोकरभरतीचे कंत्राटीकरण व शाळा दत्तक योजनेचा निर्णय रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळा