शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती प्रकरणाच्या वकालतनाम्यावर स्वाक्षरी केलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:33 IST

‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन’मधील शिष्यवृत्तीच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या वकालतनाम्यावर आम्ही स्वाक्षरीच केली नव्हती. आम्हाला न सांगताच संचालक सुनील मिश्रा यांनी याचिका दाखल केली, असा दावा याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देयाचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचे उच्च न्यायालयात शपथपत्रसुनील मिश्रा धमकी देत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन’मधील शिष्यवृत्तीच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या वकालतनाम्यावर आम्ही स्वाक्षरीच केली नव्हती. आम्हाला न सांगताच संचालक सुनील मिश्रा यांनी याचिका दाखल केली, असा दावा याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्रदेखील दाखल केले आहे. महाविद्यालयांतून ‘टीसी’ मिळावे असा अर्ज केला असता सुनील मिश्रा यांनी धमकावल्याचा आरोपदेखील तीन विद्यार्थ्यांनी लावला आहे.‘सेंट्रल इंडिया इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन’ या महाविद्यालयावर समाजकल्याण विभागाने तब्बल ५६ लाख रुपयांची वसुली काढली आहे. विद्यापीठाने मंजूर केलेल्या शिक्षण शुल्कापेक्षा अधिक शुल्क घेतल्याचा दावा महाविद्यालयावर करण्यात आला आहे. मिश्रा यांनी हे शुल्क परत केले नाही. २०१५ नंतरच्या विद्यार्थ्यांना शुल्क परतावा मिळालेला नाही. २०१६-१७ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची छाननी झाली नाही व विद्यापीठानेदेखील त्यांची परीक्षा घेतली नाही. समाजकल्याण विभागाकडून शुल्क परतावा न मिळाल्याने लोकेश मेश्राम आणि इतर विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यासंदर्भात न्यायालयाने विद्यापीठ व सामाजिक न्याय विभागाच्या प्रशासनावर नाराजी व्यक्त केली होती.सोमवारी या प्रकरणाने अचानक नवीन वळण घेतले. सुनावणीदरम्यान लोकेश मेश्राम आणि अन्य दोन विद्यार्थ्यांनी शपथपत्र दाखल करत संबंधित याचिकेबद्दल त्यांना कुठलीही कल्पना नसल्याचे न्यायालयाला सांगितले. मेश्राम याने शिष्यवृत्ती मिळण्यासाठी काही कागदपत्रांवर सही केली होती. मात्र, त्याने वकालतनामावर सही केली नाही. तसेच कधीही नोटरीकडे गेला नव्हता, असे शपथपत्रात म्हटले आहे.मेश्राम यांना संबंधित याचिकेबाबत वर्तमानपत्रांमधून माहिती मिळाली असता त्यांनी याबाबत उच्च न्यायालय प्रबंधक कार्यालयाकडे निवेदन दिले. मेश्राम आणि इतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या शपथपत्रामध्ये संबंधित प्रकारासाठी दोषी असलेल्यांवर योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचे वकील अ‍ॅड.भानुदास कुलकर्णी व सुनील मिश्रा यांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणावर ५ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होईल. याप्रकरणी मेश्राम आणि इतर दोन विद्यार्थ्यांतर्फे अ‍ॅड.अश्विन इंगोले यांनी तर विद्यापीठातर्फे अ‍ॅड.पी.सत्यनाथन यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयStudentविद्यार्थी