शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडतेयं

By admin | Updated: May 27, 2014 01:51 IST

राज्य सरकारच्या कारभारात सुसूत्रता नसल्याने महाराष्टÑ राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक दरवर्षी कोलमडू लागले आहे. वारंवार परीक्षांच्या पुढच्या तारखा द्याव्या लागत

यवतमाळ : राज्य सरकारच्या कारभारात सुसूत्रता नसल्याने महाराष्टÑ राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक दरवर्षी कोलमडू लागले आहे. वारंवार परीक्षांच्या पुढच्या तारखा द्याव्या लागत असल्याने राज्यातील हजारो उमेदवारांना फटका बसतो आहे. परिणामी उमेदवारांमध्ये सरकारऐवजी एमपीएससीच्या विरोधातच रोष निर्माण झाला आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. सरकारच्या मागणीनुसार अधिकार्‍यांची पदे भरली जातात. परंतु कित्येकदा ऐनवेळी शासनाकडून किती जागा भरायच्या याची मागणीच नोंदविली जात नाही. आरक्षण, बिंदू, संख्या अशा विविध कारणांवरून अनेकदा पदभरतीला विलंब होतो. मात्र त्याचा फटका शासनाला न बसता एमपीएससीला बसतो. त्यांना परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलावे लागते. त्याचा रोष मात्र एमपीएससीला सहन करावा लागतो. शासनस्तरावर कोणत्या कॅडरची किती पदे भरायची हेच अखेरपर्यंत निश्चित होत नसल्याने हा गोंधळ वाढतो. एमपीएससीचा व्याप दिवसेंदिवस वाढतो आहे. दरवर्षी १५ लाखांवर उमेदवार स्पर्धा परीक्षा देतात. या संपूर्ण परीक्षा पारदर्शक व्हाव्या म्हणून आॅनलाईन पद्धतीवर भर दिला जात आहे. कागदाची बचत, तत्काळ निकाल आणि गैरप्रकाराला वाव नसणे ही या पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. सध्या पाच ते दहा हजार उमेदवार असलेल्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेतल्या जातात. मात्र आता सर्वच कॅडरकडून आॅब्जेक्टीव्ह पद्धतीने आॅनलाईन परीक्षांसाठी दबाव वाढतो आहे. महाराष्टÑात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक उपलब्ध होणे आणि त्यांना एमपीएससीची लिंक जोडणे शक्य नसल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)