जिल्ह्यात १७९५ गावात टंचाई
By Admin | Updated: January 17, 2015 02:32 IST2015-01-17T02:32:49+5:302015-01-17T02:32:49+5:30
२०१४-१५ या वर्षात खरीप हंगामात नागपूर जिल्ह्यातील १७९५ गावाची पैसेवारी ही ५० पैशापेक्षा कमी असल्याने तेथे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे,...

जिल्ह्यात १७९५ गावात टंचाई
नागपूर : २०१४-१५ या वर्षात खरीप हंगामात नागपूर जिल्ह्यातील १७९५ गावाची पैसेवारी ही ५० पैशापेक्षा कमी असल्याने तेथे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी कळविले आहे.
या गावांमध्ये जमीन महसूलमध्ये सूट, सहकारी बँकेच्या कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सूट, दहावी आणि १२ वीच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामाच्या निकषात शिथिलता, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पुरवठा, शेत पंपाची वीज न तोडणे आदी सवलती लागू करण्यास मान्यता देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या मदतीतून नागपूर जिल्ह्याला ११० कोटी रुपये मिळणार असून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. (प्रतिनिधी)