‘स्कॅनिंग’च्या घोळाचा ‘बीएसस्सी’च्या विद्यार्थ्यांना फटका

By Admin | Updated: August 12, 2016 02:36 IST2016-08-12T02:36:56+5:302016-08-12T02:36:56+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘बीएसस्सी’च्या सहाव्या सत्रातील चार टक्के विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ ठेवण्यात आले आहेत.

'Scanning' riot victim 'BSc students hit | ‘स्कॅनिंग’च्या घोळाचा ‘बीएसस्सी’च्या विद्यार्थ्यांना फटका

‘स्कॅनिंग’च्या घोळाचा ‘बीएसस्सी’च्या विद्यार्थ्यांना फटका

नागपूर विद्यापीठ : चार टक्के विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘बीएसस्सी’च्या सहाव्या सत्रातील चार टक्के विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ ठेवण्यात आले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका ‘स्कॅन’च झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे मूल्यांकनच झाले नाही. इतर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता विद्यापीठाने निकाल जाहीर करून टाकले. परंतु ‘विथहेल्ड’मध्ये निकाल असलेल्या विद्यार्थ्यांचा तणाव वाढला आहे.
नागपूर विद्यापीठात विज्ञान शाखेच्या उत्तरपत्रिकांचे ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक उत्तरपत्रिका ही विद्यापीठाच्या ‘स्कॅनिंग’ केंद्रातून ‘स्कॅन’ करण्यात येते. बीएसस्सीच्या सहाव्या सत्राला ५ हजार १९० विद्यार्थी बसले होते.
यापैकी १८३ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गुणवत्ता नियंत्रणात न बसल्यामुळे ‘डिस्कार्ड’ झाल्या व त्या ‘स्कॅन’ होऊ शकल्या नाही. परिणामी त्यांचे मूल्यांकन झाले नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. याशिवाय ५७ विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकनाचे गुण प्राप्त झाले नाही किंवा त्यांनी चुकीचा ‘रोल नंबर’ टाकला. यामुळे त्यांचे निकालदेखील रोखून ठेवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 'Scanning' riot victim 'BSc students hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.