शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

एसबीएल कंपनी स्फोट ! आणखी दोघींचा मृत्यू; २२ वर पोहोचली मृत कामगारांची संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 15:34 IST

Nagpur : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एसबीएल कंपनी लिमिटेड'मध्ये १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटातील जखमींच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. उपचाराखाली असलेल्या दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एसबीएल कंपनी लिमिटेड'मध्ये १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटातील जखमींच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. उपचाराखाली असलेल्या दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या आता २२वर पोहोचली असून, सध्याच्या स्थितीत ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे १४ महिला उपचार घेत असून, दोन महिला व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. 

आम्रपाली काळसर्पे (वय ३६, रा. राऊळगाव, ता. काटोल) यांचा उपचारादरम्यान ७ मार्च रोजी रात्री ११:०० वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. त्या ५५ टक्के जळाल्या होत्या. त्या पहिल्या दिवसापासून व्हेंटिलेटरवर होत्या, तर रोशनी सूर्यकांत उमाठे (वय ३२, रा. दुधाळा) यांचा ८ मार्च रोजी दुपारी २:०० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. त्या ७५ टक्के जळाल्या होत्या. त्यांच्या हाताला गंभीर फ्रैक्चर होते, पायांवर शस्त्रक्रिया करून 'एक्सटर्नल फिक्सेशन' करण्यात आले होते.

सध्या गंभीर रुग्णांमध्ये सुजाता विनायक रक्षीत (३५) व सीमा विजय धुर्वे (२७) दोन्ही ७० टक्के, ज्योती शामू धुर्वे (२१ वर्षे) ६५ टक्के जळाल्या असून, या तिन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते.

अनेकींची मृत्यूशी झुंज सुरूच

सध्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या दुर्गा मनोज घाटगे ६० टक्के, उषा बालाजी रेवतकर ५० टक्के, मयुरी धुर्वे ४५ टक्के, मनीषा धुर्वे ४५ टक्के, काजल कोरती व रितू सलाम प्रत्येकी ४० टक्के, कविता उईके ३५ टक्के, सुनीता उईके ३० टक्के आणि वैशाली धुर्वे १५ टक्के जळाल्या असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अल्प जखमींमध्ये वैशाली सटई आणि रोशनी मसराम असून, दोन्ही ५ टक्के भाजल्या आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : SBL Company Blast: Two More Die; Death Toll Reaches 22

Web Summary : Two more women succumbed to injuries from the SBL Company blast, raising the death toll to 22. Fourteen women are still hospitalized, with two in critical condition on ventilators, battling severe burns.
टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीBlastस्फोट