शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

म्हणे, यंदा धानाचे पीक उत्तम! कृषी विभागाचा जावईशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 11:22 AM

राहुल पेटकर । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संपूर्ण रामटेक तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याअभावी धानाचे उभे ...

ठळक मुद्देसर्वेक्षणाचे आदेश नसल्याची माहिती

राहुल पेटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण रामटेक तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याअभावी धानाचे उभे पीक सुकायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुसेवाडी व महादुला परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालयावर मोर्चा नेत अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. दुसरीकडे, तालुक्यातील धानाचे पीक उत्तम असल्याचा जावईशोध कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात बसून लावला. शिवाय, आपल्याला शासनाने सर्वेक्षण करण्याचे अद्याप आदेश दिले नाही, असे सांगून हात वर केले.रामटेक तालुक्यातील महादुला, शिवनी, भंडारबोडी, मुसेवाडी, उमरी, चिचदा, सोनेघाट, पंचाळा (बु), मांद्री, देवलापार, हिवराबाजार, मनसर, काचूरवाही, नगरधन भागात यावर्षी अल्प पावसाची नोंद झाली. शिवाय, परतीच्या पावसानेही पाठ फिरवली. या धानाच्या पिकाला लोंब्यांवर असताना कालव्याचे पाणी मिळू शकले नाही.शिवाय, तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे ओलिताचे हक्काचे साधन (विहिरी व मोटरपंप) नाही. परिणामी, वाढते तापमान व प्रतिकूल वातावरणामुळे धानाचे पीक सुकायला सुरुवात झाली.या संदर्भात तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, तालुक्यातील देवलापार परिसरातील दोन - तीन गावे वगळता कुठेही धानाच्या पिकाचे नुकसान नाही. धानाचे पीक उत्तम असून, परतीचा पाऊस न बरसल्याने तालुक्यात काही ठिकाणी धानाचे थोडेफार नुकसान होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की, तालुक्यात नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. काम आटोपल्यानंतर अहवाल शासनाकडे सादर केला जाईल. यावर्षी धानउत्पादकांचे नुकसान झाल्याचे त्यांनी मान्य केले. दुसरीकडे, तालुक्यात कुठेही सर्वेक्षण करण्यात आले नाही, अशी माहिती विविध भागातील शेतकऱ्यांनी दिली.तालुक्यात दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करावे आणि शासनाने नुकसानभरपाई जाहीर करून योग्य उपाययोजना कराव्या, यासाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी (महसूल), उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना निवेदने दिली. परंतु, शासनाने या निवेदनाची दखल घेतली नाही. या गंभीर समस्येवर तालुक्यातील एकही लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते ‘अर्थ’पूर्ण राजकारणात मग्न आहेत.

शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावरधानाचे पीक सर्वात खर्चिक असून, त्याचा उत्पादनखर्च कमीतकमी एकरी २५ हजार रुपये आहे. विविध शासकीय नियम व बंधनांमुळे शेती आधीच तोट्यात आहे. त्यातच यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, उत्पदनात प्रचंड घट येणार असल्याने शेतकऱ्यांना पीककर्ज व इतर कर्ज व उसणवारीची परतफेड करायची कशी, वर्षभराचा शेती व घरखर्च भागवायचा कसा, मुलांचे शिक्षण व आजारपण यासाठी लागणारा पैसा उभा करायचा कसा अशी मूलभूत चिंता आता भेडसावत असून, शासनाने मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

टॅग्स :agricultureशेती