शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सावित्रीच्या लेकींचा मेट्रो प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:17 IST

रविवारची सकाळ नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर विद्यार्थिनींच्या उत्साही-आनंदी आवाजाचा गलका सुरू होता. प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याची त्यांची जिज्ञासा शिगेला पोहोचली होती. त्यांचा आनंद पाहून मेट्रो स्टेशनवरही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कोण होत्या या विद्यार्थिनी? मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या मेळघाट या दुर्गम भागातील आदिवासी मुलींच्या शाळेतील १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थिनी पहिल्यांदा शहर पाहायला नागपुरात आल्या होत्या. सहा दिवसाच्या वास्तव्यानंतर शेवटच्या दिवशी धावत्या मेट्रोमधून शहर पाहायला त्या मेट्रो प्रवासासाठी स्टेशनवर दाखल झाल्या होत्या. आयुष्यात पहिल्यांदाच स्टेशनसारखी उंच अद्ययावत इमारत आणि तेथील सोयी बघून थक्क होऊन अचंबित विस्मयकारक होऊन त्यांचा किलबिलाट आसमंत व्यापून टाकत होता.

ठळक मुद्देमेळघाटातील आश्रमशाळेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारची सकाळ नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर विद्यार्थिनींच्या उत्साही-आनंदी आवाजाचा गलका सुरू होता. प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याची त्यांची जिज्ञासा शिगेला पोहोचली होती. त्यांचा आनंद पाहून मेट्रो स्टेशनवरही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कोण होत्या या विद्यार्थिनी? मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या मेळघाट या दुर्गम भागातील आदिवासी मुलींच्या शाळेतील १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थिनी पहिल्यांदा शहर पाहायला नागपुरात आल्या होत्या. सहा दिवसाच्या वास्तव्यानंतर शेवटच्या दिवशी धावत्या मेट्रोमधून शहर पाहायला त्या मेट्रो प्रवासासाठी स्टेशनवर दाखल झाल्या होत्या. आयुष्यात पहिल्यांदाच स्टेशनसारखी उंच अद्ययावत इमारत आणि तेथील सोयी बघून थक्क होऊन अचंबित विस्मयकारक होऊन त्यांचा किलबिलाट आसमंत व्यापून टाकत होता.रविवारला विदर्भ वनवासी कल्याण आश्रम, मेळघाट येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या एका गटाने नागपूर मेट्रोमधून प्रवास केला. नागपूर मेट्रोने प्रवास करताना पुलावरून जाणाऱ्या धावत्या गाडीतून दिसणारे शहराचे सौंदर्य न्याहाळताना या मुली तल्लीन झाल्या होत्या. शहरापासून सर्वच दृष्टीने दूर असलेल्या मेळघाटसारख्या दुर्गम भागात अभावातील जीवन जगणाऱ्या या विद्यार्थिनींसाठी चकचकीत शहर, पक्के रस्ते, उंच इमारती, सुसाट धावत्या गाड्या हे सगळंच नवलाईचं होतं. पण बाहेर ४५ डिग्री तापलेले असताना धावणाऱ्या मेट्रोच्या आत थंड वाऱ्यात प्रवास करायला मिळतोय, हा त्यांचा मुख्य आश्चर्याचा विषय होता. १३ वर्षांच्या पूनम पाटणकर हिने पुलावरून जाणाऱ्या मेट्रोत बसणे म्हणजे विमानात बसल्यासारखे वाटत होते. तर १६ वर्षांच्या रश्मी पात्रे या विद्यार्थिनीला आपल्या आई-बाबांनी कधीही न पाहिलेल्या न ऐकलेल्या मेट्रोमध्ये आपण बसलो हे त्यांना जाऊन सांगायची उत्सुकता दाटून आली होती.नागपूर मेट्रोच्या खापरी स्थानकावरून हा प्रवास सुरू झाला तो सीताबर्डीपर्यंत चालला. यादरम्यान या विद्यार्थिनींनी दोन्ही बाजूच्या खिडकीमधून देखावे टिपले. खापरी, न्यू एअरपोर्ट, साऊथ एअरपोर्ट, एअरपोर्ट आणि सीताबर्डी या स्थानकांना भेट देऊन विस्मयकारक वाटणाऱ्या इमारती, मूर्ती, चित्रे असे सगळे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत परतीच्या प्रवासाला निघाल्या. प्रवासादरम्यान नागपूर मेट्रोत प्रवास केल्याचा आनंद त्यांच्या गप्पांमधून आणि डोळ्यातूनही ओसंडून वाहत होता. नागपूर मेट्रो ही माझी मेट्रो म्हणजेच सर्वांची मेट्रो असल्याचेच हे द्योतक आहे. या प्रवासासाठी विदर्भ वनवासी कल्याण आश्रमने पुढाकार घेतला होता. शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर मंडळी यावेळी सोबत होते.

 

टॅग्स :Metroमेट्रोMelghatमेळघाटStudentविद्यार्थी