वाघ वाचवा, सृष्टी वाचवा! :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2015 03:07 IST2015-10-08T03:07:54+5:302015-10-08T03:07:54+5:30

काळजाचे पाणी करणारी भेदक नजर. धाडसामध्ये आणि शौर्यामध्ये मागे न हटण्याचा स्वभावधर्म. अशी वैशिष्ट्ये असणारा वाघ वन्यजीवांच्या अन्नसाखळीत अग्रस्थानी आहे.

Save the tiger, save the world! : | वाघ वाचवा, सृष्टी वाचवा! :

वाघ वाचवा, सृष्टी वाचवा! :

वाघ वाचवा, सृष्टी वाचवा! : काळजाचे पाणी करणारी भेदक नजर. धाडसामध्ये आणि शौर्यामध्ये मागे न हटण्याचा स्वभावधर्म. अशी वैशिष्ट्ये असणारा वाघ वन्यजीवांच्या अन्नसाखळीत अग्रस्थानी आहे. त्याला पाहण्याची आस प्रत्येक निसर्गप्रेमी, पर्यटक बाळगून असतो. म्हणूनच जंगलं भटकंती करणाऱ्यांच्या गर्दीने फुलू लागली आहेत. मात्र, काही वर्षांपासून वाढत्या शिकारींमुळे वाघांची संख्या घटू लागली आहे. त्या अनुषंगाने ‘वाघ वाचवा, सृष्टी वाचवा’ असा संदेश देत जनजागृतीही सुरू आहे. नागपुरात १ ते ७ आॅक्टोबरदरम्यान पेंच व्याघ्र प्रकल्प, मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक कार्यालयाच्या वतीने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. बुधवारी या सप्ताहाचा समारोप झाला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी वाघांच्या वेशभूषेत नृत्य सादर करून जंगलाच्या राजाच्या संवर्धनाचा संदेश दिला.

Web Title: Save the tiger, save the world! :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.