प्रेम प्रकरणात वितुष्ट आल्याने प्रियकरावर केला बलात्काराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 22:28 IST2021-12-18T22:27:29+5:302021-12-18T22:28:46+5:30

Nagpur News तीन वर्षांपासून पती-पत्नीसारखे वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर, प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. 

Satisfied with love affair, accused of rape | प्रेम प्रकरणात वितुष्ट आल्याने प्रियकरावर केला बलात्काराचा आरोप

प्रेम प्रकरणात वितुष्ट आल्याने प्रियकरावर केला बलात्काराचा आरोप

ठळक मुद्देजातीवाचक शिवीगाळही केली प्रेयसीची सोनेगाव ठाण्यात तक्रार

नागपूर : तीन वर्षांपासून पती-पत्नीसारखे वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर, प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने तिच्या प्रियकरावर बलात्काराचा अन् जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप लावला. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे.

आरोपी राकेश शाबूलाल बंदेवार (वय ३३) हा सोनेगावमध्ये राहतो. तो एका सलूनमध्ये (स्पा) काम करतो. त्याचे २९ वर्षीय तरुणीसोबत २०१८ मध्ये सूत जुळले. मार्च, २०१८ पासून हे दोघे पती-पत्नीसारखे एकमेकांसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करीत होते. अलीकडे त्यांच्यात वितुष्ट आले. त्यामुळे तरुणीने राकेशच्या मागे लग्नासाठी तगादा लावला. यावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. राकेशने लग्नास नकार देऊन तरुणीला जातीवाचक शिवीगाळही केली. त्यामुळे तरुणीने सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी राकेशविरुद्ध ॲट्रोसिटी कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

---

Web Title: Satisfied with love affair, accused of rape