सर्वाधिक मंत्री सातारा जिल्ह्याचे; पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप, मराठवाड्यात सहाच मंत्रिपदे
By दीपक भातुसे | Updated: December 16, 2024 11:47 IST2024-12-16T11:46:18+5:302024-12-16T11:47:35+5:30
२० जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, १६ जिल्ह्यांना एकही मंत्रिपद नाही.

सर्वाधिक मंत्री सातारा जिल्ह्याचे; पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप, मराठवाड्यात सहाच मंत्रिपदे
दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: राज्य मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्याच्या वाट्याला सर्वाधिक मंत्रिपदे आली असून, सातारा जिल्ह्यातून चारजणांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्याखालोखाल जळगाव, रायगड आणि यवतमाळ जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. विभागवार विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई-कोकणाला सर्वाधिक नऊ मंत्रिपदे मिळाली आहेत. त्या खालोखाल उत्तर महाराष्ट्राला ८, विदर्भाला ७ आणि मराठवाड्याच्या वाट्याला ६ मंत्रिपदे आली आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
पश्चिम महाराष्ट्र
सातारा : शंभुराज देसाई, शिवेंद्रसिंह भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील
कोल्हापूर : हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर
पुणे : चंद्रकांत पाटील, दत्ता भरणे, माधुरी मिसाळ
उत्तर महाराष्ट्र
जळगाव : गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय सावकारे
अहमदनगर : राधाकृष्ण विखे-पाटील
नाशिक : दादा भुसे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ
धुळे : जयकुमार रावळ
मुंबई व कोकण
मुंबई : मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार
ठाणे : गणेश नाईक, प्रताप सरनाईक
रायगड : आदिती तटकरे, भरत गोगावले
रत्नागिरी : उदय सामंत, योगेश कदम
सिंधुदुर्ग : नितेश राणे
विदर्भ
नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल
यवतमाळ : संजय राठोड, अशोक उईके, इंद्रनील नाईक
वर्धा : पंकज भोयर
बुलढाणा : आकाश फुंडकर
मराठवाडा
बीड : धनंजय मुंडे, पंकजा मुंडे
छत्रपती संभाजीनगर : अतुल सावे, संजय शिरसाट
लातूर : बाबासाहेब पाटील
परभणी : मेघना बोर्डीकर साकोरे
२० जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, १६ जिल्ह्यांना एकही मंत्रिपद नाही. मंत्रिमंडळ विस्तारात समावेश झालेल्या ३९ मंत्र्यांचे जिल्हे यात गृहीत धरले आहेत.