शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
6
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
7
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
8
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
9
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
10
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
12
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
13
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
14
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
15
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
16
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
17
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
18
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
19
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य

सर्व शिक्षा अभियान : राज्यात १० लाख विद्यार्थी गणवेशाविना गेले शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 17:00 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येतो. परंतु शासनाने ५ डिसेंबर २०१६ ला काढलेल्या जीआरमध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनेचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतल्याने गणवेशाची रक्कमसुद्धा विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने २०१७-१८ या वर्षात गणवेशाच्या बाबतीत दिलेल्या अहवालात राज्यात १० लाख विद्यार्थी गणवेशाविना शाळेत गेल्याचे निदर्शनास आले आहे. कारण या १० लाख विद्यार्थ्यांनी बँकेत खातेच उघडले नव्हते.

ठळक मुद्देगणवेशाच्या बाबतीत नागपूर गडचिरोलीपेक्षाही मागास : डीबीटीच्या अहवालात उघड

मंगेश व्यवहारे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येतो. परंतु शासनाने ५ डिसेंबर २०१६ ला काढलेल्या जीआरमध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनेचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतल्याने गणवेशाची रक्कमसुद्धा विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने २०१७-१८ या वर्षात गणवेशाच्या बाबतीत दिलेल्या अहवालात राज्यात १० लाख विद्यार्थी गणवेशाविना शाळेत गेल्याचे निदर्शनास आले आहे. कारण या १० लाख विद्यार्थ्यांनी बँकेत खातेच उघडले नव्हते. या अहवालात गणवेशाच्या बाबतीत नागपूर जिल्हा गडचिरोलीपेक्षाही मागास दिसून आला. गडचिरोलीत ९०.२१ टक्के विद्यार्थ्यांनी बँकेत खाते उघडले. नागपूर जिल्ह्यात ही टक्केवारी ७४.१७ एवढी आहे.सर्वशिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, एस्सी, एसटी प्रवर्गातील मुले व बीपीएल प्रवर्गातील सर्व समाजातील मुले यांना शालेय गणवेश देण्यात येतो. गेल्या शैक्षणिक वर्षापासून शाळा व्यवस्थापन समितीऐवजी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात (डीबीटी) जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थी आणि त्याच्या आईचे नावे बँकेत संयुक्त खाते उघडण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. मात्र, ३१ मार्च २०१८ पर्यंत नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व महापालिकेच्या एकूण १,७१० शाळांमधील ८४,९२१ पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांपैकी केवळ ६२,९९० म्हणजेच ७४.१७ टक्के विद्यार्थ्यांचेच बँक खाते उघडण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. तर २१ हजार ९३१ पात्र विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडले गेले नाही. विद्यार्थ्यांना गणवेशासाठी ४०० रुपये प्रति विद्यार्थी असे अनुदान देण्यात येते. गडचिरोलीच्या बाबतीत ही आकडेवारी लक्षात घेता येथे ६३५७८ विद्यार्थी २०१७-१८ या सत्रात गणवेशासाठी पात्र ठरले. त्यातील ५७३५२ विद्यार्थ्यांनी बँकेत खाते उघडून गणवेशाचा लाभ घेतला.

 विदर्भातील जिल्ह्याची टक्केवारीजिल्हा         टक्केवारीनागपूर         ७४.१७चंद्रपूर        ७९.७७गोंदिया         ९०.७०गडचिरोली     ९०.२१वर्धा            ७५.०९भंडारा        ४१.७४अमरावती    ९८.४२यवतमाळ     ५८.०५अकोला        ४७.८८बुलढाणा      ४७.६६वाशिम        ७०.९५

 
  
  

 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा