लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतवारी निकालस मंदिराजवळच्या एका सराफा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि चांदीची लगडी असा एकूण ३ लाख, ६८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडालीपश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील मूळ निवासी असलेले बंसरी सुशील सामोही (वय ३७) महालमध्ये राहतात. ते सराफा कारागीर असून ग्राहकांच्या ऑर्डरनुसार सोन्याचांदीचे दागिने तयार करून देतात. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निकालस मंदिराजवळ इंद्रजीत कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे दागिने बनविण्याचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री त्यांच्या दुकानाच्या शटरची दोन्ही कुलपे तोडून चोरटा आत शिरला आणि सोन्याचे दागिने तसेच चांदीची लगडी असा ३ लाख ६८ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही बाब उघड झाल्यानंतर सामोही यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
सराफा दुकान फोडले : इतवारीत खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 22:10 IST
Itwari sarafa Theft, Crime News इतवारी निकालस मंदिराजवळच्या एका सराफा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि चांदीची लगडी असा एकूण ३ लाख, ६८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
सराफा दुकान फोडले : इतवारीत खळबळ
ठळक मुद्देसोन्याचे दागिने लंपास