सराफा दुकान फोडले : इतवारीत खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 10:07 PM2020-10-10T22:07:55+5:302020-10-10T22:10:38+5:30

Itwari sarafa Theft, Crime News इतवारी निकालस मंदिराजवळच्या एका सराफा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि चांदीची लगडी असा एकूण ३ लाख, ६८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

Sarafa shop broken: Sensation in Itwari | सराफा दुकान फोडले : इतवारीत खळबळ

सराफा दुकान फोडले : इतवारीत खळबळ

Next
ठळक मुद्देसोन्याचे दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतवारी निकालस मंदिराजवळच्या एका सराफा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि चांदीची लगडी असा एकूण ३ लाख, ६८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली
पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील मूळ निवासी असलेले बंसरी सुशील सामोही (वय ३७) महालमध्ये राहतात. ते सराफा कारागीर असून ग्राहकांच्या ऑर्डरनुसार सोन्याचांदीचे दागिने तयार करून देतात. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निकालस मंदिराजवळ इंद्रजीत कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे दागिने बनविण्याचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री त्यांच्या दुकानाच्या शटरची दोन्ही कुलपे तोडून चोरटा आत शिरला आणि सोन्याचे दागिने तसेच चांदीची लगडी असा ३ लाख ६८ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही बाब उघड झाल्यानंतर सामोही यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Sarafa shop broken: Sensation in Itwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.