अवकाळी पाऊस, खराब हवामानामुळे नागपूर जिल्ह्यातील रब्बीवर ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 10:06 PM2022-01-14T22:06:49+5:302022-01-14T22:08:50+5:30

Nagpur News यंदाच्या रब्बी हंगामावर ‘संक्रांत’ आल्याने सर्वत्र चिंतेचा सूर उमटत आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

'Sankrant' on rabbis in Nagpur district due to unseasonal rains and bad weather | अवकाळी पाऊस, खराब हवामानामुळे नागपूर जिल्ह्यातील रब्बीवर ‘संक्रांत’

अवकाळी पाऊस, खराब हवामानामुळे नागपूर जिल्ह्यातील रब्बीवर ‘संक्रांत’

googlenewsNext
ठळक मुद्देकिडींचा प्रादुर्भाव वाढणारहरभरा उत्पादनाला फटका

नागपूर: गुलाबी थंडीत दोन दिवसाच्या अंतराने तीन दिवस अवकाळी पाऊस बरसला. शिवाय मागील आठवडा ढगाळ वातावरण आणि धुक्याचाच राहिला. वातावरणाच्या बदलाचा विपरित परिणाम जवळपास सर्वच पिकांवर झाला असून, यंदाच्या रब्बी हंगामावर ‘संक्रांत’ आल्याने सर्वत्र चिंतेचा सूर उमटत आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

उमरेड तालुक्यात हरभरा पिकाच्या पेरणीचे क्षेत्र १५,२२२ हेक्टर आहे. गहू ३,२१४ हेक्टर, भाजीपाला ३७३ हेक्टर, सोयाबीन १५० हेक्टर तर फुलपिके ३४ हेक्टर या आणि इतर पिकांसह एकूण १९,३०८ हेक्टरमध्ये रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे. तालुक्यात साधारणत: १० नोव्हेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांची हरभरा पेरणी आटोपली. त्या शेतात आता हरभरा घाटे भरण्याच्या अवस्थेपर्यंत पाेहोचले आहेत.

१५ नोव्हेंबरनंतर पेरणी करणाऱ्या काही मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा फुलोरा आणि घाटे पकडण्याच्या अवस्थेत आहेत. उमरेड तालुक्यात १०, १२ आणि १४ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सोबतच सततच्या धुक्यामुळे आणि खराब हवामानामुळे हरभरा पिकाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सकाळी ६.३०च्या सुमारास विजांच्या कडकटाडासह पावसाला सुरुवात झाली. दोन ते अडीच तास पावसाचा जोर कायम होता. यामुळे शेतातून पाण्याचे लोट गेले. काही ठिकाणी पाणी साचले. अनेकांच्या शेतामधील गहू, भाजीपाला पिकांनाही खराब वातावरणाचा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळी सोयाबीन उत्पादकांसाठी अवकाळी पाऊस मदतीला धावून आला आहे.

किडींचा अटॅक

वारंवार होणाऱ्या सततच्या अवकाळी पावसामुळे फुलोऱ्यावर असलेला हरभरा करपण्याचीही अधिकांश संभावना व्यक्त होत आहे. घाटे अवस्थेत असलेल्या पिकांनाही फटका सोसावा लागेल. शिवाय येत्या काही दिवसात अळी अधिक जोर मारेल. मर रोगाचा प्रादुर्भावसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

हिवाळा की पावसाळा?

उमरेड तालुक्यात १० जानेवारी रोजी ७.५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दोन दिवसानंतर १४ जानेवारीला ४.११ तर पुन्हा दोन दिवसानंतर शुक्रवारी पाऊस दोन-अडीच तास पाऊस झाला. यामुळे सध्या हिवाळा सुरू आहे की, पावसाळा संपायचा आहे, असाही अनुभव सर्वांनाच येत आहे. तालुक्यात आतापर्यंत ९४१.४६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: 'Sankrant' on rabbis in Nagpur district due to unseasonal rains and bad weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती