शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नागपूरचे संजीव कांबळे राज्याचे आरोग्य संचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 1:09 AM

राज्याच्या आरोग्य संचालकपदी नागपूरचे डॉ. संजीव कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरला दुसऱ्यांदा हा बहुमान मिळाला आहे. डॉ. कांबळे यांच्या नियुक्तीने उपराजधानीतील वैद्यकीय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, आरोग्य सेविकेचा मुलगा आणि आतापर्यंत आरोग्य सेवेत भरीव योगदान दिल्याने राज्याची आरोग्य विभागाची विस्कटलेली घडी बसविण्यात त्यांना यश येईल, असे बोलले जात आहे.

ठळक मुद्देआरोग्य सेविकेच्या मुलाने गाठले शिखर : दुसऱ्यांदा मिळाला नागपूरला बहुमान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याच्या आरोग्य संचालकपदी नागपूरचे डॉ. संजीव कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरला दुसऱ्यांदा हा बहुमान मिळाला आहे. डॉ. कांबळे यांच्या नियुक्तीने उपराजधानीतील वैद्यकीय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, आरोग्य सेविकेचा मुलगा आणि आतापर्यंत आरोग्य सेवेत भरीव योगदान दिल्याने राज्याची आरोग्य विभागाची विस्कटलेली घडी बसविण्यात त्यांना यश येईल, असे बोलले जात आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालकपदाचा निकाल गुरुवारी जाहीर केला. त्यात डॉ. संजीव कांबळे यांना सर्वाधिक गुण मिळाल्याने त्यांची आरोग्य संचालक करण्याबाबतची शिफारस शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी त्यांना संचालक पदी नियुक्त करण्याचे पत्र मिळाले. सोमवारी ते या पदाची सूत्रे स्वीकारणार आहे.नागपूरच्या माधवनगर येथील रहिवासी असलेले डॉ. संजीव कांबळे यांच्या आई प्रभा कांबळे आरोग्य सेविका होत्या. त्यांनी नागपूर जिल्ह्यातील गुमथळा आणि कळमेश्वरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर त्यांच्या कार्यकाळात आरोग्य सेवा दिली आहे, तर संजीव यांचे वडील हे पोस्ट खात्यात लिपिक होते. प्रभा कांबळे यांनी गरिबांच्या वेदना जवळून बघितल्या. त्यावरून त्यांनी गरिबांना वैद्यकीय सेवा मिळाव्या म्हणून आपल्या मुलाला (संजीव) डॉक्टर करण्याचे निश्चित केले. मुलाला वैद्यकीय शिक्षणाच्या दरम्यान त्यांनी पूर्ण मदत केली. डॉ. संजीव कांबळे यांनीही आईच्या विश्वासाला सार्थ ठरवत वैद्यकीय शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. मेडिकलमधून एमबीबीएस व नंतर रोगप्रतिबंधक औषधवैद्यकशास्त्र विषयात ‘एमडी’ची पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून ते अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नागपुरात त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर नागपूर जिल्हा क्षयरोग अधिकारी, नाशिक येथे आरोग्य सहसंचालक, ठाण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी ते उपसंचालक आणि २०१५ पासून पुणे येथे सहसंचालक कुष्ठरोग या पदावर कार्यरत होते. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आरोग्य संचालकपदाची जाहिरात काढल्याने त्यांनीही अर्ज भरत मुलाखत दिली. यात त्यांना सर्वोच्च गुण मिळाले. सोमवारी ते राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालक पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. डॉ. कांबळे यांचे आजपर्यंत ३२ राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर शोध प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत, तर त्यांची आरोग्यविषयक तब्बल ११ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. संचालकपदाचा बहुमान या पूर्वी नागपूरच्या डॉ. मालती चंद्रिकापुरे यांना मिळाला होता.

टॅग्स :Healthआरोग्यState Governmentराज्य सरकार