संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये दारूच्या २४० बॉटल्स जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:41 IST2019-06-13T00:40:59+5:302019-06-13T00:41:43+5:30
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सायंकाळी ६ वाजता संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक करून त्याच्याजवळून ३१ हजार ८०० रुपये किमतीच्या दारूच्या २४० बॉटल्स जप्त केल्या आहेत.

संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये दारूच्या २४० बॉटल्स जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सायंकाळी ६ वाजता संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक करून त्याच्याजवळून ३१ हजार ८०० रुपये किमतीच्या दारूच्या २४० बॉटल्स जप्त केल्या आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील आरपीएफ जवान कामसिंह ठाकूर, जसवीर सिंह, अनिल कुमार, शेख शकील, बी. बी. यादव हे १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर होते. त्यांना पांढुर्ण्यावरून एक जण संशयास्पद स्थितीत गाडीत बसलेला दिसला. त्याने आपले नाव नीलेश विठ्ठल जगने (२७) रामटेक, जि. नागपूर असे सांगितले. त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या २४० बॉटल्स होत्या. त्याला आरपीएफ ठाण्यात आणून उपनिरीक्षक होतीलाल मिना यांच्यासमोर हजर करण्यात आले. कागदोपत्री कारवाईनंतर निरीक्षक रवी जेम्स यांच्या आदेशानुसार आरोपीला मुद्देमालासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.