रेती माफिया दोन तास आधीच कारागृहाबाहेर

By Admin | Updated: August 13, 2016 02:03 IST2016-08-13T02:03:01+5:302016-08-13T02:03:01+5:30

नागपूर जिल्ह्यातील रेती माफिया लतिफ अन्सारी याला १० आॅगस्ट रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून दोन तास आधीच...

The sand mafia is already out of the jail two hours | रेती माफिया दोन तास आधीच कारागृहाबाहेर

रेती माफिया दोन तास आधीच कारागृहाबाहेर

लतिफ अन्सारीच्या बेकायदेशीर निर्गमनामागे मोठ्या गैरव्यवहाराची शंका
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रेती माफिया लतिफ अन्सारी याला १० आॅगस्ट रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून दोन तास आधीच नियमबाह्यपणे सोडण्यात आले. यामागे मोठ्या गैरव्यवहाराची शंका व्यक्त केली जात आहे.
कारागृहातील प्रचलित नियमावलीनुसार सुटकेसंदर्भात सायंकाळी ४.३० पर्यंत आलेल्या न्यायालयीन आदेशांवर त्याच दिवशी कार्यवाही होऊन सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत आरोपी कारागृहाबाहेर येऊ शकतो. आणीबाणीप्रसंगीही सायंकाळी ६ वाजेपर्यंत आलेल्या आदेशाची कारागृह प्रशासनाला दखल घ्यावी लागते. सामान्यत: सायंकाळी ४.३० वाजेनंतर आलेल्या आदेशांवर दुसऱ्या दिवशी कार्यवाही होते आणि संबंधित आरोपी हा दुपारी १ वाजेनंतरच कारागृहाच्या बाहेर पडतो.
विश्वसनीय सूत्रानुसार लतिफ अन्सारीबाबत मात्र प्रचलित नियम तोडण्यात आले. मौजा इटगाव भागातील कन्हान नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर रेती चोरल्यावरून अन्सारी आणि साथीदारांविरुद्ध ७ जून २०१६ रोजी कोराडी पोलीस ठाण्यात भादंविच्या ३९७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला अटकपूर्व जामीन मिळाला होता.

 

 

Web Title: The sand mafia is already out of the jail two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.