शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपा तत्त्वावरील पदे भरण्याला मंजुरी

By admin | Updated: July 20, 2014 01:19 IST

लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार मेडिकलमध्ये वारसा हक्काची पदे व अनुकंपा तत्त्वावरील पदे भरण्याला मंजुरी मिळाली आहे. २००८ नंतर पहिल्यांदाच ही पदे भरण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये

नागपूर : लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार मेडिकलमध्ये वारसा हक्काची पदे व अनुकंपा तत्त्वावरील पदे भरण्याला मंजुरी मिळाली आहे. २००८ नंतर पहिल्यांदाच ही पदे भरण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.मेडिकल आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालय मिळून जवळपास ४०० चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. याचा परिणाम रुग्णसेवेसोबतच महाविद्यालयाच्या प्रशासकीय सेवेवरही पडला आहे. या जागा भरण्यासंदर्भात महाराष्ट्र जाती जमाती कर्मचारी संघाने अनेक निवेदने दिली. आंदोलनातून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले. अनुकंपा तत्त्वाच्या ज्येष्ठता यादीत राजू सोनकर यांचा पहिला क्रमांक आहे. परंतु, २००८ पासून नोकरीपासून तो वंचित आहे. न्याय मागण्यासाठी त्याचे संपूर्ण कुटुंबच उपोषणावर बसले होते. अखेर या सर्वांची दखल घेण्यात आली आहे. लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काची पदे व अनुकंपा तत्त्वावरील पदे भरण्याला मंजुरी मिळाली आहे. पदे भरण्यासंदर्भातील कारवाईला सुरुवातही झाली आहे. शनिवारी मेडिकलच्या सूचना फलकावर अशा १८० कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार यातील ज्येष्ठतेनुसार पद भरती करण्यात येणार आहे, परंतु किती टक्के ही भरती राहणार, याची माहिती कुणाचकडे उपलब्ध नाही. (प्रतिनिधी)