कामठी कॅन्टोनमेंट परिसरातील रखडलेल्या चार पदरी रस्त्याला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 21:55 IST2020-06-15T21:53:15+5:302020-06-15T21:55:47+5:30
कामठी कॅन्टोनमेंटपासून जाणाऱ्या चार पदरी रस्त्याच्या रखडलेल्या कामाला अखेर मंजुरी मिळाल्याची माहिती माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

कामठी कॅन्टोनमेंट परिसरातील रखडलेल्या चार पदरी रस्त्याला मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी कॅन्टोनमेंटपासून जाणाऱ्या चार पदरी रस्त्याच्या रखडलेल्या कामाला अखेर मंजुरी मिळाल्याची माहिती माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नागपूर ते कामठी व पुढे कन्हानपर्यंत चार पदरी रस्ता बांधण्यात येत आहे. येथील बरेचशे काम झाले आहे. परंतु कामठी कॅन्टोनमेंट परिसरातील आशा रुग्णालयासमोरचा जवळपास एक ते दीड किमीच्या रस्त्याचे काम अनेक दिवसापासून रखडले होते. त्यामुळे नेमक्या या भागात वाहनांची मोठी कोंडी होत होती. अनेकदा अपघातही झाले आहेत. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी बराच पाठपुरावा करण्यात आला. अखेर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे येथील रखडलेल्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी सुटून नागरिकांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.