शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

समृद्धी महामार्ग; अ‍ॅफकॉन्सला २४४.६४ कोटींच्या दंडाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 10:32 AM

अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला वर्धा जिल्ह्यातील सेलू तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावून २४४ कोटी ६४ लाख ७४ हजार ९०७.२ रुपये दंड का आकारला जाऊ नये, अशी विचारणा केली आहे.

ठळक मुद्देसेलू तहसीलदारांची कारवाई१५ दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समृद्धी महामार्गासाठी ३ लाख ९ हजार ६८०.३६८ ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन करून बहुमूल्य पर्यावरण उद्ध्वस्त करणाऱ्या अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला वर्धा जिल्ह्यातील सेलू तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावून २४४ कोटी ६४ लाख ७४ हजार ९०७.२ रुपये दंड का आकारला जाऊ नये, अशी विचारणा केली आहे. तसेच, यावर १५ दिवसात लेखी खुलासा सादर करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कंपनीचे काहीच म्हणणे नाही असे समजून दंड आकारला जाईल व ही रक्कम सक्तीने वसूल करण्यात येईल अशी तंबीही अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आली आहे.ही कारणे दाखवा नोटीस २० फेब्रुवारी २०२० रोजी जारी झाली असून ती अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला २ मार्च २० २० रोजी तामील झाली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-१९६६ मधील कलम ४८ (७) व (८), वर्धा जिल्हाधिकारी यांचा १२ फेब्रुवारी २०१८ रोजीचा आदेश आणि १२ जानेवारी २०१८ रोजीची शासन राजपत्र अधिसूचना यानुसार अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरवर ही कारवाई करण्यात आली आहे. अवैध उत्खननाची ईटीएस मोजणी करण्यासाठी खनिकर्म अधिकाऱ्यांनी यंत्रणा उपलब्ध करून दिली होती. १५ जानेवारी २०२० रोजी आलेल्या ईटीएस मोजणी अहवालानुसार अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने वर्धा जिल्ह्यातील मौजा चारमंडळ येथील २२१, मौजा गिरोली येथील १०१/२, १०२, मौजा कोटंबा येथील २०७/२, २०९, २१०, २११, मौजा इटाळा येथील ८, ९/१, ९/२, ९/३, ९/४, ९/५, ९/६, ११, १२ व मौजा गणेशपूर येथील ४४, ४५, ४६, ४७, ४८, ५७, ५८, व ६१ या खसरा क्रमांकाच्या जमिनीत अवैध उत्खनन करून ३ लाख ९ हजार ६८०.३६८ ब्रास मुरूम बाहेर काढला व समृद्धी महामार्गासाठी वापरला आहे.५० हजारावर झाडे तोडलीअ‍ॅफकॉन्स कंपनीने अवैध उत्खननासाठी मौजा इटाळा, मौजा कोटंबा व मौजा महाबळा येथील ५० हजारावर झाडे तोडली, अशी माहिती कोटंबा (ता. सेलू, जि. वर्धा) येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप खेडकर यांनी दिली. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र सेलूचे वनक्षेत्रपाल यांनी माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीनुसार मौजा इटाळा येथील ३५ हजार तर, मौजा कोटंबा येथील १५ हजार २०० झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच, मौजा महाबळा येथील २०० ते २५० फूट उंच टेकड्या झाडांसह भुईसपाट करण्यात आल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायती व वर्धा खनिकर्म कार्यालयाने कंपनीला खोदकामाची परवानगी दिली नाही.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग